पनवेल जितिन शेट्टी : कळंबोलीमध्ये झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांनी माथाडी कामगारांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ माथाडी कामगार मेळावा आयोजित केला होता. कामगारांच्या हितासाठी पडेल तो संघर्ष करण्याची तयारी भाजपची आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.
या मेळाव्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे, भाजपचे माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट सेलचे उपाध्यक्ष संजय भगत, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, माजी नगरसेविका मोनिका महानवर, अमर ठाकूर, अशोक मोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…