महाराष्ट्र

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा, मी नाही जनता सरकारवर नाराज आहे, मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत दाखवून देऊ

Bacchu Kadu  Target Maharashtra Sarkar : रवी राणा यांच्यावर नाव न‌ घेता निशाणा लाडकी बहीण योजनेच्या पैसा हा जनतेचा आहे, तो काही आमदारांना बाप-दादांच्या कमाईचा पैसा

अमरावती :- प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu  यांनी सरकारला इशारा दिला आहे.सरकारवर मी नाही तर जनता नाराज, सरकार जर आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांना शिंदे सरकारला दिला आहे. तर दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत असे म्हणत त्यांनी बोलताना खंत व्यक्त केली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या पैसा हा जनतेचा आहे, तो काही आमदारांना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो, असे म्हणत त्यांनी रवी राणांच्या वक्तव्याचा नाव न घेता समाचार घेतला आहे.

नेमके बच्चू कडू काय म्हणाले?

बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढेच आमचे काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे आम्हाला कळवले सुद्धा जात नाही, अशी खंत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे. तर अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावे लागते आणि भांडून आम्ही ते करून घेतो असे कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, सरकार हे लोकांसाठी असते आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा तो राहणारच आहे. काही आमदारांना असे वाटते आहे की आपण खूप मेहनत केली, घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. यांना वाटते आपल्या बाप दादाच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचा आहे. जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोकं कर भरतात याचा विसर या लोकांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0