Mira Road Tadipar News: सराईत आरोपीच्या विरोधात 7 गुन्ह्याची नोंद, आरोपीमुळे मिरा रोड परिसरात गोमांस विक्री प्रकरणी हिंसक वळण लागले होते
मिरा रोड :- राज्यात गोमांस विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर राज्यात गोमांस विक्री केले जाते. यावर प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहे. मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने Mira Road Police Station अशा सराईत गुन्हेगाराविरोधात कारवाई करत दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. Mira Road Tadipar News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात परिमंडळ -1 च्या हद्दीत काशिगाव, काशिमिरा, नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार कासमअली शरीफ कुरेशी, (53 वर्ष, रा.शितलनगर, हॉटेल गरीब नवाब जवळ, गुरुकृपा हॉस्पीटल बाजुला मिरारोड ) याला ताब्यात घेऊन दोन वर्षाच्या कालावधीकरिता ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले आहे. आरोपी कुरेशी याच्याविरोधात 2016 ते 2024 या कालावधीमध्ये नयानगर, काशिगांव आणि काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरण, जनावराच्या बेकायदेशीर गोमांस विक्री असे एकूण सात गुन्हे दाखल आहे. 2024 मध्ये दाखल गोमांस विक्रीच्या गुन्ह्यामध्ये मिरा रोड परिसरात आरोपीमुळे तणाव परिस्थिती निर्माण झाली होती.
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांनी कारवाई करत आरोपीला हद्दपार केले आहे. Mira Road Tadipar News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…