•NCCRP Portal दिलेला तक्रारीमुळे फसवणुकीतील 20 लाख 25 हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश
मिरा रोड :- fake share trading करणाऱ्या व्यक्तीसाठी सायबर विभागाचे NCCRP Portal देवदूत ठरले आहे. सायबर फसवणुकीतील तब्बल 20 लाख 25 हजार रुपये ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली होती.परंतु सायबर विभागाच्या पोर्टलमुळे फसवणुकीतील रक्कम परत मिळू देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील नयानगर पोलीस ठाण्याच्या बाबतीत राहणारे दत्ताजी यांच्या मोबाईलवर इफेक्ट शेअर ट्रेडिंग गुंतवणूक करण्यासाठी एक लिंक प्राप्त झाली होती. या लिंक द्वारे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग करून अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवत गुंतवणूक करण्याबाबत सांगितले होते. गुंतवणूक दराने म्हणजेच दत्तांनी यांनी त्या लिंक द्वारे ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. परंतु आपण गुंतवणूक केलेली रक्कम परत न आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी सायबर विभागाच्या NCCRP Portal तक्रार केली होती.
सायबर विभागाने तक्रारदार यांनी दिलेला तक्रारीवरून, ऑनलाइन झालेले व्यवहारातील रक्कम ज्या ज्या बँक खात्यात गेली आहे ती रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून दत्तांनी यांचे फसवणुकीत केलेले 20 लाख 25 हजार रुपये परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बालाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी,माधुरी धिंडे, पोलीस अंमलदार विलास खाटीक, राहुल बन सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…