Mira Road Cyber Crime Branch Arrested Fraudster: सायबर विभागाची कामगिरी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराच्या एकूण रकमेपैकी 7 लाख 50 हजार रुपये परत मिळवून देण्यास यश
मिरा रोड :– शेअर ट्रेडिंग करण्यास Share Market Trading भाग पाडून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट ॲपमध्ये तब्बल 20 लाख 40 हजार 193 रुपयाची गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक ऑनलाईन फसवणूक Online Fraud in Mira Road झाल्याची घटना काशिगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी फसवणुकीतील एकूण रक्कमेपैकी 7 लाख 50 हजार रुपये परत मिळवून देण्यास यश आले आहे. Mira Road Latest Crime News Mira Road Share Market Fraud
मिरा रोड पूर्व राहणाऱ्या धैर्य किरण सोनी (31 वर्ष) यांना शेअर मार्केट ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवण्याची आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाली होती. सोनी यांची वीस लाख 40 हजार 193 रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाली होती. या विरोधात काशिगांव पोलीस ठाण्यात धैर्य सोनी यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4),3(5), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड),66(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Latest Crime News Mira Road Share Market Fraud
काशीगांव पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाने तात्काळ गुन्ह्याचा तपास करत तक्रारदार यांनी केलेल्या व्यवहाराबाबत सर्व रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी संबंधित बँक यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि पाठपुरावा करून धैर्य सोनी यांच्या फसवणुकीतील एकूण रक्कमेपैकी 7 लाख 50 हजार रुपये परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Mira Road Latest Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…