क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Road Sex Racket :मीरा रोडमध्ये ‘सेक्स स्पा’चा पर्दाफाश: 8 मुलींची सुटका, 3 अटकेत!

Mira Road Sex Racket Latest News : मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचा ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध’ कक्षाचा छापा.

मीरा-भाईंदर, :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) मीरा रोड येथील एका मसाज पार्लरवर छापा टाकून मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आठ पीडित मुलींची सुटका केली असून, तीन आरोपींना अटक केली आहे. Mira Road Latest Crime News

मीरा-भाईंदर पोलिसांची धडक कारवाई; ‘रॉयल किंग थाई स्पा’च्या आड चालणारा गोरखधंदा उघड

पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की, साईबाबा नगर, मीरा-भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व) येथील ‘रॉयल किंग थाई स्पा’ मध्ये मसाजच्या नावाखाली पैशांच्या मोबदल्यात वेश्यागमनासाठी मुली पुरवल्या जातात. या माहितीच्या आधारे, दिनांक 23 जुलै 2025 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत, बनावट गिऱ्हाईक आणि दोन पंचांना सोबत घेऊन स्पाची सत्यता पडताळली.

सायंकाळी दरम्यान पोलिसांनी स्पावर छापा टाकला. त्यावेळी मिथुन लक्ष्मण राठोड (वय 32, व्यवस्थापक), सुनील काशिनाथ पवार (वय 30, व्यवस्थापक) आणि विशाल मुन्ना राठोड (वय 26, हाऊसकीपिंग) हे आरोपी आपापसात संगनमत करून आठ पीडित मुलींना पैशांसाठी वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत असल्याचे आढळून आले. ते प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन मसाजच्या नावाखाली वेश्यागमनासाठी जागा उपलब्ध करून देत होते आणि त्यातून स्वतःची उपजीविका चालवत होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून 5 मोबाईल हॅन्डसेट आणि 33 हजार 60 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या आठ पीडित मुलींना संरक्षणार्थ रेस्क्यू फाउंडेशन येथे पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी, पोलीस हवालदार चेतनसिंग राजपुत यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने, मीरा रोड पोलीस ठाण्यात अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143 (3), 3 (5) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे दिनांक 24 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात निष्पन्न होणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि मदन बल्लाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, सहायक फौजदार शिवाजी पाटील, सहायक फौजदार राजाराम आसवले, पोलीस हवालदार किशोर पाटील, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर (सर्व नेमणूक – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, मीरा-भाईंदर) तसेच प्रशासन, गुन्हे शाखेच्या महिला पोलीस शिपाई जयवंती वसावे आणि महिला पोलीस शिपाई आफ्रिन जुनेदी या पथकाने कारवाई करत स्पा चा भांडाफोड केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0