Mira Road Share Market Scam News : नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सिंग यांना ऑनलाइन हॉटेल बुकिंग च्या नावाने फसवणूक
मिरा रोड :- नया नगर पोलीस ठाण्याच्या Naya Nagar Police Station हद्दीत राहणाऱ्या सिंग यांना हॉटेल बुकिंग करण्याकरिता गुगल वर सर्च केले असता त्यांना ऑनलाइन हॉटेल बुकिंग करण्याकरिता मोबाईल फोन आला. बुकिंग करिता अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर ओटीपी प्राप्त झाल्याचे सांगून तो ओटीपी देण्यास सांगितले. सिंग यांनी ओटीपी देताच त्यांच्या खात्यातील पैसे कमी झाल्याचा मेसेज त्यांना आल्याने आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली आहे Mira Road Scam असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित NCCRP Portal वर ऑनलाइन फसवलं की बाबत तक्रार दाखल केली होती.
NCCRP Portal वर तक्रार नोंदवल्याने तपासात फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यात गेली असल्याने पोलिसांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा करत ती रक्कम गोठवण्यात आली . न्यायालयाचे आदेशानंतर सिंग यांना त्यांची फसवणूक झालेली संपूर्ण 79 हजार 300 रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यात परत जमा करण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फर्नांडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, बोरकर यांनी पार पाडली आहे.