क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Robbery News : घरफोडीप्रकरणी 24 तासांत आरोपी अटकेत; मिरारोड पोलिसांची धडक कारवाई

Mira Road Latest Robbery News : 5.52 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त

मिरारोड : एमटीएनएल रोड, मिरारोड पूर्व येथे घरफोडी करून 6.73 लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास केवळ 24 तासांत अटक करण्यात मिरारोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे Mira Road Crime Beanch प्रकटीकरण पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपीकडून 5.52 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. Mira Road Latest Crime News

तक्रारदार डायना विल्सन (वय 58) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 जूनच्या पहाटेच्या सुमारास त्यांनी घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली. कपाटातील 77 ग्रॅम सोनं आणि 9,000 रुपये रोख असा एकूण 6.73 लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. यावरून मिरारोड पोलीस ठाण्यात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. केवळ 24 तासांच्या आत पोलिसांनी राहुल वेदप्रकाश चौहाण (वय 26) या आरोपीस अटक केली. तो मूळचा नेपाळमधील पोखरा शहराचा रहिवासी असून सध्या मिरारोडमध्ये वास्तव्य करत होता.

आरोपीकडून चोरीस गेलेले 69 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (मूल्य: 5.52 लाख रुपये) जप्त करण्यात आले आहेत. त्याचा याआधीही घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असून त्याच्यावर 2020,2024 मध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 मिरारोड, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, मेघना बुरांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिरारोड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार झावडे, गिरमे,पाटील, तेरये, हरणे, पवार,इंगोले, पोलीस शिपाई देवरे,दासरे व तांत्रिक मदत जाधव (पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ-1) यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0