Mira Road Rape Case : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात वीस वर्ष शिक्षा
Mira Road Rape Case News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती.पोक्सोअंतर्गत अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालयाकडून सुनावणी
मिरा रोड :- 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. Mira Road Rape Case पोक्सो कायद्यांतर्गत सुनावलेली शिक्षा आहे. वकील अहमद सगीर हसन शेख, (वय 56) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा न्यायाधीश व्हि एल भोसले यांच्या समक्ष सुनावणी झाल्यानंतर शिक्षेचा निर्णय सुनावला.आरोपी वकील अहमद सगीर हसन शेख याच्यावर कलम 376 (1) एन एल 376 (2) 4,8 पोक्सो कायदा अंतर्गत नयानगर पोलिस ठाण्यात येथे गुन्ह्याची नोंद आहे. आरोपीने 8 वर्षीय मुलीवर तिच्या घरी कुणीही नसताना अत्याचार केला तसेच तिला जीवेत ठार मारण्याची धमकीही दिली होती.
आरोपी वकील अहमद सगीर हसन शेख याला अटक करुन त्याचे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.गुन्हयाची मअति जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांचे न्यायालयात सुनावणी सुरु होती. 6 जानेवारी 2025 रोजी केसची अंतिम सुनावणी होवून न्यायालयाने आरोपी यास सीआरपीसी 235 (2) अन्वये 20 वर्ष सश्रम कारावास एक हजार रु दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
गुन्हयाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक सुनिल साळुंखे यांनी केला असुन त्यांना गुन्हयात पोलीस हवालदार निशांत दरेकर,यांनी पुराचे गोळा करणे व कागदपत्र बनविण्यात मदत केली आहे.सरकारी अभियोक्ता चंदणे यांनी कामकाज पाहीले आहे.
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विवेक मुगळीकर, सहाय्यकपोलीस आयुक्त, नवघर विभाग तसेच तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे (सध्या मा. सहा. पो. आयुक्त, बृहन्मुबई), तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी (सच्या नेमणुक पेल्हार पोलीस ठाणे), तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सूपे (आर्थिक गुन्हे शाखा), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे सध्या नेमणुक नयानगर पो. स्टे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक महादेव इंगवले यांनी न्यायालयीन कामकाजात योग्य ती मदत केली असून वॉरंट/ समन्स अंमलदार सहाय्यक फौजदार सुपडू तडवी (सध्या संलग्न मुख्यालय), पोलीस अंमलदार शैलेश साबळे, निरज घोडेकर यांनी वेळोवेळी न्यायालयाकडून प्राप्त समन्सची बजावणी करुन व साक्षीदार यांना वेळोवेळी न्यायालयात हजर ठेवून महत्वाची भूमिका बजावली आहे.