क्राईम न्यूज

Mira Road Police : मिरारोड पोलीस ठाण्यात शिस्तीचा भंग! आरोपींनी स्टोर रूममध्ये सिगारेट ओढत धिंगाणा घातला; व्हिडिओ व्हायरल

Mira Road Police Latest News : पोलीस कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह; 4 आरोपींना अटक ‘कोटपा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; दोषी अंमलदारांवर कारवाईची तयारी

मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मिरारोड पोलीस ठाण्यात Mira Road Police शिस्तीचा भंग झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यातील स्टोर रूममध्ये चार आरोपींनी खुलेआमपणे सिगारेट ओढत आणि नाचत धिंगाणा घातल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे. पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणीच आरोपींनी अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. Mira Road Police Latest News

नेमके काय घडले?

विविध गुन्ह्यांसंबंधी चौकशीसाठी संशयित आरोपींना अटक करून मिरारोड पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते. पोलीस अधिकारी दुसऱ्या आरोपींना आणण्यासाठी बाहेर गेले असताना, हीच संधी साधून तेथे बसलेले चारही आरोपी पोलीस ठाण्याच्या स्टोर रूममध्ये शिरले. तिथे शिरल्यानंतर या आरोपींनी स्वतःजवळ असलेल्या सिगारेटी पेटवून धूम्रपान करायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, या आरोपींनी धूम्रपान करत धिंगाणा घालताना आणि नाचतानाची चित्रफीत स्वतःच तयार केली आणि ती समाजमाध्यमांवर व्हायरल केली. ही चित्रफीत व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मिरारोड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

पोलिसांची कारवाई

आरोपींनी पोलीस ठाण्यात घातलेल्या धिंगाण्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत व्हायरल चित्रफितीतील 4 आरोपींना अटक केली आहे. तसेच, त्यांच्यावर कोटपा कायद्यांतर्गत (Cigarettes and Other Tobacco Products Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जे अधिकारी आणि अंमलदार कर्तव्यात कसूर केल्यामुळे जबाबदार असतील, त्यांच्यावर देखील वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे मिरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी स्पष्ट केले आहे.

vivek

Recent Posts