Mira Road Police News: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 6 पोलीस अधिकाऱ्यांचं पुरस्कार देत आयुक्तांनी केले कौतुक
Mira Bhayandar Police Latest News : डिसेंबर महिन्यात 6 गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्या बद्दल मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
मिरा रोड :- डिसेंबर महिन्यात 6 गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्या बद्दल मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी पुरस्कार देऊन कौतुक केले आहे.दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्या पोलीस अधिकार्याला पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात आले. डिसेंबर महिन्यात 6 पोलीस अधिकार्यांची निवड करण्यात आली.
मिरा रोड पोलीस ठाण्याच्या Mira Road Police Station हद्दीतील खून आणि चोरीच्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटकेची कारवाई करत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे आणि त्यांच्या पथकाला आयुक्तांकडून पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे.
भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी प्रकरणातील सराईत वीस वर्षाच्या गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीकडून पाच मोबाईल आणि तीन हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी दरोडा घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषी पुरावे सादर करत आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे आणि त्यांच्या पथकाला आयुक्तांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांनी 72 वर्षीय महिलेला जबर मारहाण आणि चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडे सोन्याचे दागिने ज्याची किंमत एक लाख वीस हजार पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अविराज कुराड आणि त्यांच्या पथकाला त्यांनी केलेल्या कामगिरी बाबत पोलीस आयुक्त यांच्याकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
वसई विभागातील नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा घालणाऱ्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून पाच लाख 75 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम आणि त्यांच्या पथकाने केलेला कामगिरी बाबत आयुक्तांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नालासोपारा विभागातील बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणीतील 27 वर्षीय आरोपीला 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेच्या तपासणीनंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कामगिरी बाबत पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्याकडून गौरव करण्यात आले आहे.