Mira Road News : रस्ता सुरक्षा अभियान-2025 पोलिसांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती
Mira Road Police News : “35 व्या रस्ता सुरक्षा अभियान”, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून शालेय विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रम
मिरा रोड :- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मागील सप्ताहापासून मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयातील महाविद्यालय, रिक्षा स्टॅन्ड, आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आली आहे. याच अनुषंगाने मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काशिमीरा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सागर इंगोले यांनी आज रस्ता सुरक्षा अभियान विषयासंबंधित जनजागृती करिता शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
35 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत काशिमीरा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सागर इंगोले यांनी कॉस्मोपॉलिटन हायस्कुल, मिरारोड पूर्व तसेच सेंट व्हिन्सेंट डे पॉल हायस्कूल, भाईंदर पश्चिम या शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना केल्या. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियाना विषयी जनजागृती करणेकरिता चित्रकला स्पर्धेचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये एकूण तीन विद्यार्थ्यांना चांगले चित्रकला व निबंध स्पर्धा केली म्हणून त्यांची निवड करण्यात येवून त्यांना बक्षीस जाहिर करण्यात आले आहे.रस्ता सुरक्षा अभियाना मध्ये शाळेतील एकूण 75 विद्यार्थी, रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमा मध्ये उपस्थित होते.