क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road News : मिरा रोड परिसरातील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरू

Mira Road Police Latest News : वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे ; वाहतुकीला होतो मोठा अडथळा

मिरा रोड :- मिरा-भाईंदर शहरांतील गर्दी होणाऱ्या रस्त्यांच्या कडेला हजारो बेवारस आणि भंगार वाहनांमुळे नागरिकांना चालण्यास त्रास सहन करावा लागत आहे. Mira Road Police News या गाड्यांमुळे वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या वाढली आहे. यामुळे काही दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी आणि नो-पार्किंग झोनमध्ये अनधिकृतपणे वाहने पार्क केली जातात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश जाहीर केला होता. मीरा-भाईंदर शहर महानगरपालिकेकडे पार्किंग झोन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई कशी करावी, हा प्रश्न पडला होता. शहरांतील अनेक रस्त्यांच्या कडेला कित्येक महिन्यांपासून भंगार गाड्या पडलेल्या असल्याने सर्वत्र घाण पसरत होती. नागरिक या भंगार गाड्यांवर कचऱ्याच्या पिशव्या फेकत होते. साफसफाई कर्मचारी हे कचरा उचलत नसल्याने कचरा सडून दुर्गंधी पसरली असल्याने मच्छरांची पैदाससुद्धा वाढली होती.

बेवारस वाहनांपैकी 106 तीन चाकी चार चाकी बेवारस वाहने ज्या कोणा व्यक्तींची असतील त्या व्यक्तींनी वाहनांच्या मुळ कागदपत्रासह पोलीस निरीक्षक, काशिमिरा वाहतुक शाखा यांना संपर्क साधावा अथवा ई-मेल Pitrfashimira.mb-vv@mahapolice.gov. in अथवा मोबाईल नं.७७१००१२८९७ यावर संपक्र साधुन वाहनाची ओळख पटवुन मालकी हक्क सिद्ध करुन ताब्यात घ्यावी जर का सदर वाहने जाहीर सुचना प्रसिद्ध झाल्यापासुन 6 महिन्याचे आत ताब्यात घेतली नाहीत तर वाहनांची त्यांना आवश्यकता नाही असे गृहित धरुन सदर वाहने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 82 प्रमाणे हक्क न सांगितलेली मालमत्ता समजुन म.पो.अधि. कलम 85 ची प्रक्रिया राबवून जाहीर लिलाव करुन येणारी रक्कतम म.पो.अधि. कलम 87 प्रमाणे शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.106 बेवारस वाहनांचे मालकांना आपली मालकी हक्क सिध्द करुन वाहने घेवून जाणेबाबत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0