
Mira Road Sex Rackets Busted : व्हॉट्स एप वर तरुणींचे फोटो पाठवून नंतर मीरा भाईंदर मधील लॉज बुक करायला लावून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या एका सराईत दलालांवर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिरा रोड :- व्हॉट्स एप वर तरुणींचे फोटो पाठवून नंतर मीरा भाईंदर मधील लॉज बुक करायला लावून वेश्या व्यवसायासाठी Mira Road Sex Racket तरुणी पुरवणाऱ्या एका दलालांवर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा Mira Road Police Station दाखल करण्यात आला आहे .
मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष चे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांना वेश्या दलाल बाबत माहिती मिळाल्या नंतर बोगस गिऱ्हाईक द्वारे त्याच्याशी संपर्क केला . एश्वर्या ऑर्केस्ट्रा बार समोर, मिरारोड पूर्व, समोर बोलावले होते. पोलिसांनी सापळा रचून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने छापा टाकून दलाल ताब्यात घेतले आहे. दलाल आरोपी अंबिका छोटु केसरी, (वय 44 , सध्या रासर्वोदय कॉम्पलेक्स, गोल्डन नेस्ट समोर, भाईंदर पूर्व मुळ रा. जि. हजारीबाग, राज्य झारखंड) असे आहे. सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने मिरारोड पोलीस ठाणयात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 62, 143सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 4,5 प्रमाणे आज (5 एप्रिल) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Mira Road Latest Crime News