Mira Road News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुलडोजर कारवाई, महानगरपालिका आणि पोलिसांकडून मोठी कारवाई
•अनधिकृत डान्सबार, पब, हुक्का पार्लर यांच्यावर पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या समक्ष कारवाई
मिरा रोड :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील घटनेनंतर राज्यभरात बुलडोजर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. अनधिकृत पब, क्लब, डान्सबार, ऑर्केस्ट्रा बार, हुक्का पार्लर, शाळा महाविद्यालय बाहेरील अनधिकृत टप्प्या अशा ठिकाणावर मुख्यमंत्र्यांकडून सर्व महानगरपालिकेच्या आयुक्तांना कारवाईचे निर्देश दिले आहे. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनीही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या दोन ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त केले आहे तर काशिमीरा भागातील 15 12 आणि लॉजला पालखीने कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.
महानगरपालिका आयुक्त संजय काटकर आणि पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली आहे. मिरा रोडच्या शीतल नगर येथील ऐश्वर्या, बिंदिया, टाइमलेस, कनाकिया नाका येथील अंतपुरा आणि नया नगर मधील आर के एन बार लॉज अशा पाच बारच्या बेकायदा पत्रा शेड, किचन आधी वाढीव अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. तसेच शुक्रवारी काशिमीरा महामार्गावरील संगीता ऑर्केस्ट्रा बार पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.
शनिवारी महापालिका आयुक्त संजय काटकर व पोलिस आयुक्त मधुकर पांडेय हे स्वतः कारवाईसाठी उतरले होते. काशीमीरा महामार्गावरील केम छो आणि एमपी पॅलेस हे दोन ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त केले. केम छो ऑर्केस्ट्रा बारचे थोडे वाढीव बांधकाम शुक्रवारी तोडले होते, परंतु बार पूर्ण जमीनदोस्त न केल्याबद्दल आरोप होऊ लागल्यानंतर शनिवारी तो पूर्ण तोडण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाडही उपस्थित होते.