Mira Road News : “परवाह किंवा काळजी” 35 वा रस्ता सुरक्षा अभियान सांगता समारोह पोलीस पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत

Mira Bhayandar Police News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या उपस्थितीत 35 वे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे सांगता आयुक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे
मिरा रोड :- “परवाह किंवा काळजी”या धोरणाला अनुसरून मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या मार्फत 35 वे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न झाले आहे. 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 पर्यंत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या काशिमीरा वाहतुक शाखा, वसई वाहतुक शाखा व विरार वाहतुक शाखा यांनी वाहतुकीच्या नियमाची अंमलबजावणी आणि जनजागृती संदर्भात विविध उपक्रम राबविले होते. पोलिसांकडून या एक महिन्याच्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय आणि शालेय विद्यार्थ्यांकरिता तसेच ऑटो रिक्षा, यांना वाहतुकीच्या नियमानाचे पालनाचे धडे पोलिसांनी शिकवले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी वाहतुकीय नियमानाच्या जनजागृतीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात पोलिसांकडून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत निबंधस्पर्धा चित्रकारस्पर्धा,मैदानी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन पोलिसांकडून करण्यात आले होते. महिनाभराच्या या उपक्रमानंतर समारोह सोहळा बालाजी बॅन्क्वेट हॉल, विरार पश्चिम येथे संपन्न झाला आहे. पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला असून पोलिसांकडून विद्यार्थी आणि वाहतूक पोलीस यांचा सत्कार करण्यात आला आहे.


मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त यांनी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत व अपघातास प्रतीबंध होणेकरीता घ्यावयाची दक्षता व वाहतुकीसंबंधीत शिस्तीचे मार्गदर्शन केले आहे. निबंधलेखन व चित्रकला स्पर्धामधील प्रथम तीन विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.या शिवाय ज्या संस्थांचे मांन्यवर यांनी पोलीसांना कार्यक्रम राबवीणेस किंवा इतर प्रकारे जनहितार्थ पोलीस मदत केली त्यांना सुध्दा यथोचीत सत्कार करुन सन्मानित करण्यात आले आहे.पत्रकार व शालेय शिक्षकांचा सुध्दा सन्मान करण्यात आला.टेम्पो, रिक्षा, टैंकर चे चालक मालक हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थीत होते.