क्राईम न्यूज

Mira Road News : बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक

Mira Road Naga Nagar Police Arrested illegal Bangladeshi Women : नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. महिला भारतात विनापरवाना प्रवेश करून खोटे कागदपत्र व्दारे वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिरा रोड :- मिरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. Mira Road Naga Nagar Police Arrested illegal Bangladeshi Women मिरारोडच्या नयानगर आणि परिसरात एका बांगलादेशी महिला बेकायदेशीर वास्तव्य करत होत्या. या महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलीय.

नयानगर अस्मिता अनिता बिल्डिंग येथे एक बांगलादेशी नागरिक पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.

पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता नया नगर हि महिला आढळल्या. त्यांची चौकशी केली असता ती मूळची बांगलादेशी असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच त्या भारतात आल्याचं निष्पन्न झालं. तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड युनिव्हर्स पार्क असे खोटे कागदपत्र तयार करून ही महिला वास्तव्य करत होते.या महिलेच्या विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार चेतन सिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक फौजदार रामचंद्र पाटील,राजाराम आसाचले, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर, पोलीस हवालदार किशोर पाटील, चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार अश्विनी भिलारे यांनी केली आहे.

vivek

Recent Posts