Mira Road Police Take Action On illegal Migrant : मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही महिला भारतात विनापरवाना प्रवेश करून वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिरा रोड :- मिरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. Mira Road Police Take Action On illegal Migrant मिरारोडच्या शिवार गार्डन परिसरात दोन बांगलादेशी महिला येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलीय.
रिद्धी सिद्धी हॉस्पीटलच्या समोर, शिवार गार्डन मिरारोड व गोकुळ व्हिलेज बिल्डींग जवळ मिरारोड पूर्व
येथे काही बांगलादेशी महिला नागरिक येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी या ठिकाणी पंचा समक्ष सापळा रचून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.त्यांची चौकशी केली असता त्या मूळच्या बांगलादेशी असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच त्या भारतात आल्याचं निष्पन्न झालं. मिरारोड पोलीस ठाण्यात Mira Road Police Station दोन जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहापोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील,शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत,केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे, सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर व महिला पोलीस शिपाई चैताली सानप, नेम प्रशासन विभाग, गुन्हे शाखा यांनी केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…