Mira Road News : ॲड. पुनित चतुर्वेदी यांच्याकडून पोलिसांना नविन फौजदारी कायदे विषयक मार्गदर्शन

Mira Bhayandar Police Latest News : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांना नवीन कायद्यांचे धडे! विधीज्ञांनी केले मार्गदर्शन; कार्यशाळा संपन्न
मिरा रोड :- केंद्र शासनाने संसदेत कायदा संमत करून जुने भारतीय कायदे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदा 1882 यांच्यात बदल करून अनुक्रमे नवीन कायदे, Mira Road Police News भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन नवीन कायदे तयार करून ते संमत केले आहेत. सदर कायदे संपूर्ण देशपातळीवर लवकरच लागू होणार आहेत. Mira Road Police Latest News



केंद्र सरकारने देशातील जुने कायदे बदलले आहे. त्यासोबतच नवे कायदे संमत केले आहेत. या कायद्यांसंदर्भात पोलीस दलातील अधिकाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ-3 यांच्यातर्फे विधीतज्ञ ॲड. पुनीत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये विधीज्ञांनी मार्गदर्शन केले.
त्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-3 मध्ये कार्यरत अधिकारी व अंमलदार यांना नवीन कायद्याबाबत माहिती व्हावी यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी 5 मार्च रोजी बोळींज पोलीस स्टेशन तर्फे क्लब-1, ग्लोबल सीटी विरार प. येथे नविन फौजदारी कायदे विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त विरार, परिमंडळ-3 मधील सर्व प्रभारी तसेच दुय्यम अधिकारी यांचे सह 1) शांताता मोहल्ला कमीटीचे सदस्य 2) महिला दक्षता समिती सदस्य 3) शाळा महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग 4) प्रतिष्ठीत नागरीक 5) पत्रकार बंधू 6) विवा कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.