Mira Road News : मीरामधून 3 बांगलादेशी नागरिक अटकेत
Mira Road Police Arrested Bangladeshi Illegal Migrants : मीरारोड शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या 2 बांगलादेशी महिला व 1 पुरुष अश्या 3 जणांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष ने अटक केली आहे
मीरा रोड :- मीरा रोड शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या 2 बांगलादेशी महिला व 1 पुरुष अश्या 3 जणांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष ने अटक केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मीरा-भाईंदर यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या साईकृष्णा बिल्डिंग समोरील सिनेमॅक्स सिनेमाजवळ मिरा रोड पूर्व या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक विनापरवाला कामासाठी येणार येत असल्याची बातमी मिळाली असून ते विनापरवाना राहत असल्याची माहिती ही पोलिसांना Mira Bhayandar Police मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा रचून दोन पंचा समक्ष तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडील चौकशीत बांगलादेशातून भारतात बेकायदा घुसखोरी करून ते मीरा भाईंदर शहरात काम करण्यासाठी आले असल्याचे समोर आले अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे यांना दिली आहे. मिरा रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध पासपोर्ट अधिनियमा सह विदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले गेले आहेत .
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे सहाय्यक फौजदार उमेश पाटील,रामचंद्र पाटील,शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत, केशव शिदे, सम्राट गावडे सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर तसेच महिला पोलीस हवालदार लतादेवी एक्कलदेवी, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा, महिला पोलीस शिपाई जयवंती वसाचे, नेमणुक प्रशासन विभाग, गुन्हे शाखा यांनी केली आहे.