क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road News : नगरसेवकाचे घर जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपीला 10 वर्षाची शिक्षा!

Mira Road Latest Crime News: नशा मुक्तीच्या वादातून नगरसेवक यांचा मुलगा आणि त्याची बहीण यांना मारहाण करून त्यांचे घर जाळून जीवे ठार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालय, ठाणे यांनी दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे, 2018 चे प्रकरण

मिरा रोड :- फिर्यादी रुफी जुबेर इनामदार (वय 23) यांचे वडील जुधेर इनामदार हे स्थानिक नगरसेवक असून ते नशामुक्ती संदभांत नवानगर परीसरातील सोसायटयामध्ये मिटींग घेवून जनजागृती करत होते.नयानगर येथील शम्स मस्जिदच्या पाठीमागील रोडवर काही मुले दारु पिवून मोटार सायकल मध्ये उभी करून उभे राहत असल्याने त्याबाबत जुबेर इनामदार यांनी राम्स मस्जिदच्या शेजारील सोसायटी सोबत बैठक घेऊन त्यांची पोलिसांना तक्रार केली होती.त्यामध्ये तेथील स्थानिक मुलेच दारु पिवून रोडवर अस्ताव्यस्त मोटार सायकली उभ्या करतात अशी तक्रार केली होती. त्या गोष्टीचा परिसरात राहणारे आरोपी युनेब नासीर केवल व आसीफ अनवर खान यांनी मनात राग धरुन 3 फेब्रुवारी 2018 च्या त्या रात्रीच्या सुमारास फिर्यादी नगरसेवक जुबेर यांचा मुलगा रुफी व तिची बहीण सिदरा, (वय 25) अशा दोघीजणी घरी झोपलेल्या असतांना फिर्यादी व तिचे कुटुंबियांना जिवे ठार मारण्यासाठी त्यांचे बिल्डींगमध्ये जाऊन घरातून बाहेर पडू नये म्हणून आरोपी आसीफ खान याने घराचे मुख्य दरवाजाची बाहेरील कड़ी लावून दरवाजावर प्लास्टीक बॉटलमध्ये आणलेले पेट्रोल टाकून आग लावून घर जाळून फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून नयानगर पोलीस ठाणे Nayanagar Police Station कलम 307,436,440,342,64 प्रमाणे 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना 10 वर्षाचे सश्रम शिक्षा सुनावली आहे. Mira Road Latest Crime News

आरोपींन विरुद्ध सबल पुरावे गोळा करून 1 मे 2018 रोजी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांचे न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणी अंतिम सुनावणी देताना न्यायालयाने आरोपी युनेव नासीर केवल,आसीफ अनवर खान यांना 10 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. Mira Road Latest Crime News

तत्कालिन पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (सध्या नेमणुक पोलीस आयुक्त, ठाणे शहर) यांनी केला असून त्यांना सदर गुन्हयात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश निकम (सध्या नेमणुक वाचकमा पोलीस आयुक्त मि.मा.व.वि.), सहाय्यक फौजदार रमेश हमवे (सध्या सेवानिवृत्त), महेश इंगळे (सध्या नेमणुक काशिमीरा पो.स्टे.), पोलीस हवालदार मंजूर शेख (सच्या नेमणूक शहापुर पो.स्टे.) यांनी पुराचे गोळा करणे व कागदपत्र बनविण्यात मदत केली आहे. न्यायाधीश जी.जी.भन्साली, अति. जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांनी आरोपीना शिक्षा सुनावली असून केसमध्ये सरकारतर्फ सरकारी अभियोक्ता आर.डब्ल्यु.पांडे यांनी कामकाज पाहीले. या केसमध्ये प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 10. मिरारोड, विवेक मगळीकर,सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे (सध्या नेमणुक मुंबई शहर), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे नेमणुक नयानगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक महादेव इंगवले, कोर्ट ऑडली पोलीस हवालदार प्रतिक सुर्यवंशी, पोलीस अंमलदार संदीप माने यांनी न्यायालयीन कामकाजात योग्य ती मदत केली असून समन्स अंमलदार शैलेश साचले, निराज घोडेकर यांनी वेळोवेळी न्यायालयाकडून प्राप्त समन्सची बजावणी करुन व साक्षीदार यांना वेळोवेळी साक्षकामी न्यायालयात हजर ठेवून महत्वाची भूमिका बजावली आहे. Mira Road Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0