Mumbai Murder News: "Husband slits his throat to death – wife writes bloody end for lover!"
Mira Road Murder Arrested From Utterpradesh : आरोपी पतीला उत्तर प्रदेश मधून अटक, सावत्र मुलाला भेटत असल्याचा राग मनात धरून पत्नीची पंधरा वर्षांपूर्वी केली हत्या
मीरा रोड :- 15 वर्षापूर्वी झालेल्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. Mira Road Murder 24 मे 2011 मध्ये सावत्र मुलगा भेटायला येत असल्याचा राग मनात धरून त्याने पत्नीचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्याविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात Nalasopra Police Station 2011 मध्ये कलम 302 प्रमाणे हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी जवाब जब्बार सय्यद तेव्हापासून पसार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नालासोपारा पूर्व येथील संतोष भवन परिसरातील तुळशीनगर, चावशेत पाहा, कारगील टेकडी येथील व्दारका चाळ येथे राहणारी मयत महिला रिहाना (वय 35) हि तेथे दूसरा नवरा जवाद जब्बार सय्यद यांच्या सोबत तीचे पहिल्या नवरा अन्वर खान याचे पासुन झालेल्या एक मुलगा व दोन मुलीसह सदर ठिकाणी राहण्यास होती. परंतु तीचा मोठा मुलगा महंमद हरुल अन्वर खान हा नालासोपारा येथे जरीचे कारखान्यात काम करुन त्याच ठिकाणी मित्रांसह राहत होता. तो अधून मधून त्याचे आईला व भावंडाना भेटणीकरीता जात-येत असल्याने त्याचे सावत्र वडील जवाद जब्बार सय्यद यास राग येत होता या कारणावरुन पती पत्नी मध्ये वाद होत होते.
22 मे 2011 रोजी महंमद खान हा त्याचे आई रिहाना व भावंडांसोबत घरी मुक्काम केल्याच्या कारणावरुन 24 मे 2011 रोजी रात्रीच्या सुमारास रिहाना व आरोपी पती जवाद जब्बर सय्यद यांच्यात वाद होवून त्याने पत्नी झोपेत असतांना तिच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केली होती. याची तक्रार मुलगा महंमद याने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आरोपी घटना घडल्यापासून फरार झाला होता.
गुन्हयातील आरोपी यांचा यापुर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील तो गेल्या 15 वर्षा पासुन मिळून येत नव्हता. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक फौजदार आसिफ मुल्ला, पोलीस हवालदार संग्राम गायकवाड, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोविच केंन्द्र, हनुमंत सुर्यवंशी असे तपास पथक तयार केले होते.
गुन्हयाची नालासोपारा पोलीस ठाणे येथून माहिती घेवुन नमूद पोलीस पथकाने गेले 01 महीन्या पासुन सतत अहोरात्र मेहनत घेवुन तपासात सातत्य ठेवून नालासोपारा भागातून आरोपीची माहीती घेतली असता आरोपी हा त्याच्या मूळ गावी उन्नाव, लखनऊ उत्तरप्रदेश येथे आपले अस्तीत्व लपवून राहत असल्याची माहीती मिळून आली होती.
पोलिसांनी मुक्त बातमीदारामार्फत तसेच आरोपीच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीला सापळा रचून त्याच्या मूळ गावी उन्नाव लखनऊ येथून अटक केली आहे. आरोपीला लखनऊ यांचे न्यायालयात हजर करून त्याची दिनांक 28 जानेवारीपर्यंत ट्रान्झीट रिमांड घेण्यात आलेली आहे.अशा प्रकारे पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घालुन ठार मारुन गेले 15 वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणण्यास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…