Mira Road Mobile Robbery : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीकडून 3 गुन्हयांची उकल, 13 मोबाईल जप्त
Mira Road Mobile Robbery Thief Arrested : मांडवी पाडा, अण्णा मंदिरा जवळ काशिगांव परिसरात राहणारे हरीम नबी अन्सारी यांचे राहते घरी 08 सप्टेंबर मोबाईल चोरून नेले होते
मिरारोड :- मोबाईल चोरी करणाऱ्या Mobile Robbery सराईत आरोपीला अटक करून 4 गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.काशीगांव गुन्हे शाखेच्या Kashigaon Crime Branch प्रकटीकरण पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले 13 मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Mira Road Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 सप्टेंबर च्या दरम्यान हरीम नबी अन्सारी ( अण्णा मंदिर जवळ, काशिगाव मिरा रोड) परिसरात राहणाऱ्या यांच्या घरी रात्रीच्या दरम्यान चोरी झाल्याचे तक्रार कांशीगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(ए),331(4),331(1) प्रमाणे अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी काशिगाव पोलीस ठाण्यात अधिक वाढत्या चोरीच्या घटना आळा घालण्याकरिता तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अन्सारी यांच्या घरी झालेल्या मोबाईल आणि रोख रक्कम चोरीच्या घटनेबाबत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने सराईत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 11 मोबाईल फोन जप्त केले आहे. अटक आरोपीचे नाव अब्दुल रहमान ताहीर बडु (रा. जामा मस्जिद जवळ, काठीटाचाड हॉटेल मागे, नालासोपारा)असे असून त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी इत्यादी गुन्हे चार गुन्हे दाखल आहे. Mira Road Latest Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलिस उप आयुक्त परिमंडळ 1, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील, काशिगांव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगांव पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी केली असुन घरफोडीचा गुन्हा उघड करुण सराईत आरोपीला अटक केली आहे. Mira Road Latest Crime News