Mira Road Crime News : Credit Card द्वारे ऑनलाईन फसवणूक
Mira Road Online Credit Card Fraud News: ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 77 हजार 688 रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार नावे चंपालाल यांना अनोळखी मोबाईल धारकाने फोन केला. त्यानंतर त्यांचे क्रेडिट कार्डाचे व्यवहार चालु ठेवण्याकरीता क्रेडिट कार्डाची माहिती देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी माहिती दिली असता त्याचे क्रेडिट कार्डाचे खात्यातून आर्थिक फसवणूक झालेबाबत सायबर पोलीस ठाणे अर्ज दिनांक 11 मार्च 2023 अन्वये प्राप्त करण्यात आला आहे. Mira Road Crime News
तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झालेल.या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. फसवणूक रक्कम Amazon च्या मर्चड च्या अकाऊंटवर गेल्याचे दिसून आले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम यांचविण्यात आली. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळे सदरची फसवणूक रक्कमेपैकी 77 हजार 688 रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मूळ खात्यावर परत मिळविण्यात आली. Mira Road Crime News
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी प्यावयाची काळजी…
- बैंक/क्रेडीट कार्ड बैंक कोणत्याही प्रकारे ग्राहकांना एसएमएस किंवा फोनवर संपर्क साधून
- वैयक्तिक गोपनीय माहिती विचारणा करत नाही.
- आपले बैंक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती उघड करू नये.
- अनोळखी लिंक, Application डाऊनलोड करू नये.
- ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (ग न्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, सुवर्णा माळी, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल सावळे, राजेश भरकडे, आकाश बोरसे यांनी पार पाडली आहे.
नागरिकांना पोलिसांकडून आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच Mira Road Crime News
www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.