Mira Road Fraud News : ऑनलाइन फसवणूक ; क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी लिंक पाठवून आर्थिक फसवणूक
Mira Road Cyber Crime News : सायबर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, ऑनलाइन क्रेडिट कार्ड फसवणुकीतील 47 हजार 88 रुपये तक्रारदाराच्या खात्यावर परत मिळवून दिले
मिरा रोड :- ऑनलाइन आर्थिक फसवणूक Online Finical Fraud झाल्याची तक्रार मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या सायबर Mira Bhayandar Cyber Department विभागाला तनवार यांनी दिली होती. तनवार यांना क्रेडिट कार्ड अपडेट संदर्भात मेसेज Credit Card Update Message आला आणि एक लिंक पाठवण्यात आली होती. ती लिंक ओपन केल्यास तनवार यांच्या क्रेडिट कार्ड खात्यावरून 47 हजार 88 रुपये कपास झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर Vasai Virar Cyber Department विभागाला त्या संदर्भात तक्रार दाखल केली होती. Mira Road Latest Crime News
तक्रारदाराची फसवणुकीची रक्कम गोठवून, मूळ खात्यात परत आणून दिली
सायबर विभागाने तनवार यांच्या तक्रारीवरून संबंधित खात्याच्या क्रेडिट कार्डला पत्रव्यवहार करून तक्रारदार याची मूळ रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर विभागाने पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्या फसवणुक रक्कम 47 हजार 88 रुपये ही तक्रारदाराच्या खात्यावर परत मिळवून देण्यास यश आले आहे. Mira Road Latest Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील बाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फनोंडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे यांनी पार पाडली आहे. Mira Road Latest Crime News
Mira Road Fraud News : Online Fraud; Financial fraud by sending links to update credit cards