क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Fraud News : अँटी आयरन मेकिंग कॉईन नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mira Road Fraud News : आयरन मेकिंग कॉईनला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी लोकांची दिशाभूल, लाखोंचा गंडा पोलिसांनी टोळीच्या आवळल्या मुसक्या

मिरारोड :- नागरिकांनो सावधान!! राज्यात एक टोळी सतर्क झाली आहे. अँटी आयरन मेकिंग कॉईन Anti iron Making Chemical असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक करणारी टोळीचा नयानगर पोलिसांनी Nayanagar Police Station पर्दाफाश केला आहे. मिरा रोड रेल्वे Mira Road Railway Station स्थानकाच्या जवळ असलेल्या अरफा हॉटेलमध्ये आरोपी येथे गुन्ह्यातील फिर्यादी यांना अँटी आयरन मेकिंग कॉईन बनवण्यासाठी विशेष प्रकारचे केमिकल आणून त्यांचे निर्मिती करून बाजारात विक्री केल्यास मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल असे आमिष दाखविले होते. त्यानंतर फिर्यादी याला आरोपी यांनी 50 हजार रुपये घेऊन ते कॉईन विकले होते. परंतु आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येताच फिर्यादी यांनी नयानगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Fraud News

अँटी आयरन कॉईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

फसवणुकीच्या घटनेतील हा नवा प्रकार मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने पोलिसांकडून सतर्क म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार नयानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी विलास तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप राख,अब्दुलहक देसाई तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग भाट व अंमलदार यांनी घटना घडली त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार कसोशीने शोधून एका आरोपीला अटक केली होती. आरोपीने त्याच्या इतर साथीदारांचे नाव सांगून पोलिसांनी त्यांना भाईंदर परिसरातून अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक करून त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली केली आहे. तसेच हि टोळी आपल्या मित्रांच्या मदतीने आयरन मेकिंग कॉइन च्या कामाबाबत माहिती पसरवते आणि मग कोल्हापूर,ठाणे,वसई, नालासोपारा,चिपळूण, पुणे, लातूर,भांडुप या भागात लोकांच्या पार्ट्या आणून त्यांना विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जाते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार,आरोपींनी आतापर्यंत अनेक लोकांना फसवणूक केल्या असून आत्तापर्यंत मिळालेल्या दोन फिर्यादीवरून पोलिसांनी आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासच समोर आले आहे. आरोपींना अटक केली असून आरोपींना 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पोलिसांकडून असे आवाहन करण्यात आले आहे की, जर आपली फसवणूक झाली असल्यास त्वरित पोलिसांना तक्रार करावी. Mira Road Fraud News

आरोपींची नावे

1.कपील हरीषचंद सिकोरीया (37 वर्ष), व्यवसाय टेलर, रा.बोरीवली पूर्व

2.सुरज नामदेव मोरे (41वर्ष) व्यवसाय दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स,रा.भाईंदर

3.किरण कालुभाई परमार (33 वर्ष), व्यवसाय दलाल, रा. नवघर रोड, भाईंदर पूर्व

4.सनी सुहास दत्ता (24 वर्ष) रा.भाईंदर पश्चिम

कशाप्रकारे आयरन कॉईनवर रासायनिक प्रक्रिया करायची ही टोळी

लोकांना विश्वासात घेवुन ॲन्टी कॉईन चे महत्व सांगुन त्यांना विकत घेणेकरीता सांगून लोकांना एक तांब्याचा कॉईन दाखवुन त्यावर केमीकल, म्लीसरीन, पावडर, मुलतानी माती, पॅरामेंगनेशन पावडर लाल रंगाची, कॉपर सल्फेट पावडर निळ्या रंगाची, ऑईल असे वापरुन एका रुम मध्ये सर्व सेटअप बसवुन तोडावर मास्क लावुन हातात ग्लोज घालुन लोकाना दूर उभे करुन जवळ येवु नका नाहीतर केमीकल खुप स्ट्रांग आहे त्यामुळे कॅन्सर होवु शकतो असे सांगुन टेबलावर सर्व साहीत्य ठेवुन त्यावर मॅगनेट ठेवुन त्यावर कापुस अर्थरुन त्यावर फॉईल पेपर लावुन त्याचेवर ताब्याचे काईन ठेवून लोकांना त्यावर सुई धागा घेवुन तो कॉईन वर धरला असता खाली असलेल्या मॅगनेट मुळे सुई 60 डिग्री फिरत असल्याचे भासवुन लोकांना कॉईन काम करत असल्याचे पटवून देत त्यांची फसवणूक करणे अशा प्रकारची त्यांची गुन्हयाची यूएसबी आहे. Mira Road Fraud News

पोलीस पथक

अँटी आयरन मेकिंग कॉईन नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाशपोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड परीमंडळ 1 मिरारोड, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंन्द्र मोकाशी, नवघर विभाग, विलास सुपे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक देसाई (क्राईम) नयानगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग भाट, पोलीस उपनिरीक्षक महेंन्द्र लोणे, धनंजय गायकवाड, सहाय्यक फौजदार राजेश काळपुंड, पोलीस हवालदार विकास यादव, विजय गुरव, महेश खामगळ, प्रमोद केन्द्रे, मनोज साबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब पाटील, सौरभ इंगळे, रेहमत पठाण, समीर वाळुंज,विकी पवार यांनी अटक केली आहे. Mira Road Fraud News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0