क्राईम न्यूज

Mira Road Drug News : एमडी ड्रग्ज तस्करांवर सर्वात मोठी कारवाई! मीरा-भाईंदर पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक; 28 कोटींचा अंमली पदार्थ जप्त

Mira Road Police Take Action On Drug Smugglers : पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यातील उत्कृष्ट अधिकारी/अंमलदारांचा सत्कार

मिरा रोड :- अंमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात मीरा- भाईंदर पोलिसांनी सप्टेंबर 2025 महिन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलाचे आज कौतुक करण्यात आले. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते मासिक गुन्हे आढावा बैठकीत उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला. या कामगिरीमध्ये तब्बल 28 कोटींहून अधिक किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, हे विशेष. Mira Road Police Latest News

उत्कृष्ट गुन्हे उकल – प्रथम क्रमांक: 19 कोटींचे ‘एमडी’ जप्त

गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये काशिगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. 8 ऑगस्ट 2025 रोजी एका महिला आरोपीकडून 105 ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने एकूण 14 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 8 किलो 990 ग्रॅम 6 मिली वजनाचा ‘एमडी’ (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ आणि तो तयार करण्यासाठी लागणारे 35,655 लिटर रसायन, तसेच 975 किलो रासायनिक पावडर जप्त करण्यात आली. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत 19 कोटी 8 लाख 1 हजार 750 रुपये आहे. Kashigaon Police Latest News

सदर उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत, दत्तात्रय सरक, सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत आणि संदिप शिंदे यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

द्वितीय क्रमांक: पाकिस्तान कनेक्शन उघड!

वालीव पोलीस ठाणे (गुन्हे शाखा कक्ष-3) यांना द्वितीय क्रमांक मिळाला. वसई पूर्व परिसरातून अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 8 कोटी 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे 2 किलो 11 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. तपासामध्ये या अंमली पदार्थाचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी हॉरेंसिंग भाटी याला राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातून अटक करण्यात आली. हा हेरॉईनचा साठा थेट पाकिस्तान देशातून मागवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Waliv Police Latest News

पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे आणि त्यांच्या पथकातील अधिकारी/अंमलदार यांचा गौरव करण्यात आला.

उत्कृष्ट दोषसिद्धी (Conviction) – तस्करांना कठोर शिक्षा

सप्टेंबर महिन्यात गुन्ह्यांमध्ये यशस्वी दोषसिद्धी मिळवल्याबद्दलही पोलीस पथकांचा सत्कार करण्यात आला. नयानगर पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यात आरोपींना मेफेड्रॉन ड्रग्ज प्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. तर इतर दोन आरोपींना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे यांनी सबळ पुरावे गोळा केल्यामुळे हे शक्य झाले. Nayanagar Police Latest News

गुन्हे उकल आणि आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात ठाणे पोलिसांनी मोठी तत्परता दाखवल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago