क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Cyber News : सायबर सेलच्या वतीने मेडिकल असोसिएशनचे वार्षिक‌ कार्यक्रमात जनजागृती कार्यशाळा

Mira Road Cyber Police Latest News : सायबर पोलिसांनी डॉक्टर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोनशे प्रतिनिधींना सायबर जनजागृती बाबत केले मार्गदर्शन

मिरा रोड :- सायबर सेलच्या Mira Road Cyber Cell News वतीने रविवारी 16 मार्च रोजी मीरा-भाईंदर वसई विरार मेडिकल असोसिएशनचे वार्षिक कार्यक्रम GCC club , auditorium मिरा रोड येथे सुदर्शन डॉक्टर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रतिनिधी यांच्याकरिता सायबर गुन्हे, स्वसंरक्षण प्रतिकारपर मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक सुजित शकुमार गुंजकर यांनी डॉक्टर आणि उपस्थित प्रतिनिधी यांना ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया या संदर्भात फेसबुक, व्हॉटसॲप, इंस्टाग्राम, टिकटॉक या ॲप्लिकेशनचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन तसेच पोलिस आयुक्तालयाकडून महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या दामिनी पथक, पोलिस दिदी पथक, लेडिज पेट्रोलिंग पथक याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी 20 ते 65 वयोगटातील एकूण 200 डॉक्टर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे प्रतिनिधी हजर होते. तसेच कार्यक्रमामध्ये डॉक्टर्स च मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांचे वेबसाईट सुरक्षित ठेवण्याबाबत महत्वपूर्ण अश्या सूचना देण्यात आल्यात, तसेच सायबर गुन्हे जनजागृतीबाबत पत्रक वाटप करण्यात आली. कार्यक्रमाला डॉक्टर्स व मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच सदरच्या कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.

सदरचे कार्यक्रमामध्ये भाईंदर मेडीकल असोसिएशनचे अध्यक्षा डॉ. माधवी जाधव व सचिव डॉ. श्री. अगोल जाधव यांनी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे सायबर पोलीस ठाणेचे पोलिस Cyber Police Station News निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0