क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Road Cyber Fraud : सायबर पोलिसांचा ‘कमाल’! गमावलेले 3.23 लाख रुपये तातडीने मिळवून दिले!

Mira Bhayandar Latest Cyber Fraud News : फसवणुकीच्या तातडीच्या तक्रारीने टाळले मोठे नुकसान, सायबर पोलिसांनी केली यशस्वी ‘रिकव्हरी’

मीरा-भाईंदर :- एका सायबर फसवणुकीच्या प्रकरणात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने एक अविश्वसनीय कामगिरी केली आहे. केवळ OTP शेअर केल्याने गमावलेले तब्बल 3 लाख 23 हजार रुपये पोलिसांनी काही तासांत परत मिळवून दिले. यामुळे एका तक्रारदाराचे मोठे आर्थिक नुकसान टळले. Mira Road Latest Crime News

ही घटना भाईंदर परिसरातील एका तक्रारदारासोबत घडली. त्यांनी गुगलवर एका बँकेची वेबसाईट शोधली. पण ती बनावट वेबसाईट असल्याने त्यांना चुकीचा नंबर मिळाला. बँकेतून बोलत असल्याचा बनाव करणाऱ्या एका व्यक्तीच्या जाळ्यात ते अडकले. फसवणूक करणाऱ्याने त्यांच्याकडून डेबिट कार्डची गोपनीय माहिती आणि OTP मिळवला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम कपात झाल्याचा मेसेज आला. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून ही रक्कम काढण्यात आली होती.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी जराही वेळ न घालवता थेट सायबर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे या प्रकरणाने वेग घेतला. सायबर पोलिसांनी तातडीने, NCCRP Portal या माध्यमातून तक्रार नोंदवून कारवाई सुरू केली.

पोलिसांनी तात्काळ संबंधित ऑनलाइन शॉपिंग आणि ई-कॉमर्स कंपन्यांशी संपर्क साधला. त्यांनी पत्रव्यवहार करून झालेला व्यवहार तात्काळ रद्द करण्याची विनंती केली. सायबर पोलिसांच्या या जलद आणि अचूक कार्यवाहीमुळे, फसवणूक झालेली संपूर्ण 3 लाख 23 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या मूळ बँक खात्यात सुरक्षित परत जमा झाली.

या कामगिरीचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाला जाते. तसेच, सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, वैभव धनवडे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, अमिना पठाण, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, आणि पोलीस अंमलदार सायन शेवाळे, कुणाल सावळे, विलास खाटीक आणि सोमनाथ बोरकर यांनी यात मोलाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0