क्राईम न्यूज

Mira Road Cyber Fraud : सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याच्या बहाण्याने लुटलेले 2.45 लाख रुपये तक्रारदाराला मिळवून दिले परत

Mira Road Police Latest Cyber Crime News : लिंकवर क्लिक करताच खात्यातून पैसे लंपास; सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे फसवणुकीची रक्कम 24 तासांत खात्यात जमा

मिरा रोड | सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या एका नागरिकासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलीस देवदूत ठरले आहेत. क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्याच्या बहाण्याने झालेली 2 लाख 45 हजार 446 रुपयांची फसवणूक सायबर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने हाताळून ती संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या मूळ खात्यात परत मिळवून दिली आहे. Mira Road Latest Crime News

नेमकी काय घडली घटना?

काशिमिरा पोलीस ठाणे Kashmira Police Station हद्दीत राहणारे तक्रारदार वलानी यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरील व्यक्तीने आपण ‘ॲक्सिस बँके’तून बोलत असल्याचे सांगून वलानी यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डची मर्यादा (Limit) वाढवून हवी असल्यास मोबाईलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती भरण्यास सांगितले. वलानी यांनी माहिती भरताच त्यांच्या खात्यातून 2 लाख 45 हजार 446 रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वेळ न घालवता सायबर पोलीस ठाणे गाठले. Mira Road Latest Crime News

पोलिसांची ‘ॲक्शन’ आणि तांत्रिक पाठपुरावा

सायबर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ NCCRP पोर्टलवर तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासात ही रक्कम एका ई-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन शॉपिंगसाठी वापरण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी संबंधित शॉपिंग कंपनीशी त्वरित संपर्क साधून झालेल्या व्यवहाराची माहिती दिली.पोलिसांच्या तांत्रिक पुराव्यांमुळे संबंधित कंपनीने तो व्यवहार रद्द केला आणि वलानी यांची फसवणूक झालेली पूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा करण्यात आली.

या पथकाने बजावली कामगिरी

पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक वैभव धनवडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

सायबर पोलिसांचे आवाहन

“कोणतीही बँक फोनवर लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि ओटीपी शेअर करू नका. फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन नंबरवर किंवा स्थानिक सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवा.”

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago