मुंबईक्राईम न्यूज

Mira Road Cyber Crime : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; Investment app द्वारे 22.70 लाखांची फसवणूक, सायबर पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास यश

Mira Road Cyber Crime Branch Arrested Fraudster : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाची कामगिरी : फसवणुकीतील रक्कम मूळ खात्यात परत देण्यात पोलिसांना यश

मिरा रोड :- investment app मध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास दुप्पट आर्थिक नफा मिळेल असे सांगून मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मिरा रोड पोलीस ठाण्याच्या Mira Road Police Station हद्दीत राहणारे मेहक यांची फसवणूक झाली होती. तब्बल 22 लाख 70 रुपयाची आर्थिक फसवणूक झाली होती. “From Victim to Victor: Police’s Success in Cyber Fraud Investigation” फसवणुकीबाबत सायबर विभागाला तक्रार केली असता सायबर विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत फसवणुकीतील रक्कम मूळ खात्यावर परत मिळवून देण्यास यश आले आहे. Mira Road Latest Crime News

मेहक यांना टेलिग्राम अँप वर investment app मध्ये गुंतवणूक करून दुप्पट रक्कम मिळत असल्याबाबतची जाहिरात पाहिली होती.मेहक यांनी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारदाराने एकूण 22 लाख 70 हजार रुपयांचे रक्कम भरली होती. परंतु अनेक कालावधी गेल्यानंतर भरलेले रक्कमेवर कोणतीही दुप्पट रक्कम किंवा गुंतवलेले रक्कम परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी फसवणुकी बाबत सायबर पोलीस ठाणे Cyber Police Station येथे समक्ष हजर राहून तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांच्या एनसीसीआरपी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. “Trend Alert: Investment Scam Exposed in Miraroad, Cyber Police to the Rescue” पोलिसांनी तक्रारदार याचे सविस्तर तक्रार त्यांनी बँकेत केलेले व्यवहार या संबंधित माहिती घेऊ बँकेकडून त्यांनी पाठवलेली रक्कम थांबवण्यात आली त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या सोबत न्यायालयातील सर्व अर्ज दाखल करून सायबर पोलिसांनी अहवाल सादर केला होता.तसेच दोन महिने पाठपुरावा करून तक्रारदार याची फसवणूक झालेली रक्कम 22 लाख 70 हजार न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदार यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Mira Road Latest Crime News

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाच्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम,स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार कुणाल सावळे, ओंकार डोंगरे,प्रविण सावंत व सोनाली मोरे यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0