•फसवणुकीचा शिकार झालेल्या महिलेला दिला दिलासा, सायबर पोलिसांनी केली आर्थिक सुटका
मिरा रोड :– ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यावर बहुतांश नागरिक हार मानतात, पण मिरा-भाईंदर सायबर पोलिसांनी एका महिलेला 1.50 लाख रुपयांची रक्कम पुन्हा मिळवून देत धाडसी आणि तत्परतेचा उत्तम दाखला दिला आहे.
तक्रारदार इरनाक यांनी सोशल मीडियावर एका वेबसाईटवर मोबाईल फोनच्या कमी किमतीतील जाहिरात पाहून खरेदीचा निर्णय घेतला. त्यांनी सदर वेबसाईटवरून 1.50 लाख रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र मोबाईल वेळेत न पोहोचल्याने फसवणुकीची जाणीव झाली.
त्यानंतर त्यांनी मिरा रोड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर क्राईम पोर्टलवर नोंद घेतल्यावर, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ऑनलाईन व्यवहाराच्या तांत्रिक तपासणीत फसवणूक झालेली रक्कम एका ई-कॉमर्स खात्यात वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर आणि त्यांच्या पथकाने संबधित ई-कॉमर्स कंपनीसोबत पत्रव्यवहार करून रक्कम रोखण्यात यश मिळवले. अखेर तक्रारदाराच्या मूळ बँक खात्यात 1.5 लाख रुपये परत जमा करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी स्वप्नील वाव्हळ, प्रसाद शेनोळकर, वैभव धनवडे, अमिना पठाण, स्नेहल पुणे, कुणाल सावळे, माधुरी धिंडे आणि सायन शेवाळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…