Mira Road Cyber Crime News : मिरा-भाईंदर वसई विरार सायबर विभागाचे उत्कृष्ट कामगिरी, फसवणुकीतील आर्थिक रक्कम मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश
मिरा रोड :- सायबर विभागाने ऑनलाइन Cyber Crime Department आर्थिक फसवणूक झालेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणातील तक्रारदार यांचे पैसे मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Investment scheme आणि fake link याच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी दोघांची फसवणूक केली होती. परंतु मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत या दोन्हीही फसवणुकीतील तक्रारदार यांचे पैसे परत मिळवून देण्यास यश आले आहे. सायबर पोलिसांनी दोन्ही प्रकरणात सात लाख 20 हजार रुपये सायबर भामट्यांच्या तावडीतून परत मिळून दिले आहे. Mira Road Cyber Crime Latest News
मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कोतवाल यांना मोबाईलवर मेसेज द्वारे लिंक प्राप्त झाली होती.लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँकेच्या खात्यातून दहा लाख रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांना आला होता. आर्थिक फसवणुकीबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाणे येथे मार्च महिन्यात तक्रार दाखल केली होती. Mira Road Cyber Crime Latest News
तसेच नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बेडेकर यांना विविध टास्कमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सुरुवातीला त्यांना काही रक्कम सायबर भामट्याकडून परत मिळवून दिली होती. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून मोठी रक्कम गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. मोठे रक्कम गुंतवली असता कोणताही परतावांना मिळाला नाही त्यांची एक लाख वीस हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार मार्च महिन्यात दिली होती. Mira Road Cyber Crime Latest News
सायबर विभागाने दोन्ही तक्रारदार यांचे खात्यातून झालेल्या व्यवहाराचे पडताळणी करून वेगवेगळ्या बँक खात्यावर वरती झालेले रक्कम गोठवून. बँकेचे पत्र व्यवहार करून ती रक्कम मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर विभागाने कोतवाल यांचे दहा लाखातील सहा लाख रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे. तर बेडेकर यांचे एक लाख वीस हजार रुपये पूर्ण रक्कम मूळ खात्यावर परत मिळवून देण्यास यश आले आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात एकूण सात लाख वीस हजार रुपये मूळ खात्यावर परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Mira Road Cyber Crime Latest News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक, राहुल बन, शुभम कांबळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…