Mira Road Cyber Crime : सायबर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे कंपनीला मिळाले 1.59 कोटी परत
Mira Road Cyber Crime News : सायबर पोलिसांच्या सतर्कमुळे शहरातील एका नामांकित कंपनीलचे चुकीच्या बँकेत गेलेले पैसे परत मिळवून देण्यास यश, कोट्यावधी रुपये कंपनीला परत
मीरा रोड :- मिरा रोड पोलीस ठाण्याच्या Mira Road Police News हद्दीत असलेल्या डिजिटल सोल्युशन Digital Solution या कंपनीचे मालक सोलंकी यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहार करीत असताना 4 एप्रिल 2024 रोजी वेगळ्या बँक खाते मध्ये रक्कम वर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते.सायबर पोलिसांनी सतर्कता दाखवत ही सर्व रक्कम संबंधित कंपनीला परत मिळवून दिली. सायबर पोलिसांनी कंपनी आणि संबंधित बँकेच्या शी पत्रव्यवहार करून संपूर्ण कंपनीची रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सोलंकी यांचे डिजिटल सोल्युशन या कंपनीच्या एका चुकीच्या व्यवहारामुळे एक कोटी 59 लाख 1 हजार 550 इतके मोठे रक्कम एका चुकीच्या बँकेत वर्ग झाली होती. कंपनीला सदर चूक लक्षात येताच सायबर पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर NCCRP Portal वर तक्रार दाखल केली होती.कंपनीने बँकेची रक्कम परत मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतु बँक कोणत्याही प्रकारे रक्कम न दिल्याने कंपनीने सायबर पोलिसांचे संपर्क साधला आणि सायबर पोलिसांनी संपूर्ण रक्कम संशयत बँक खात्यामध्ये थांबवण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया आणि संबंधित बँकेकडे पत्रव्यवहार करून न्यायालयाच्या आदेशाने फसवणुक झालेली रक्कम एक कोटी 59 लाख 1 हजार 550 संपूर्ण रक्कम मूळ खात्यात परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलीस उप आयुक्त गुन्हे अविनाश अंबुरे यांच्या हस्ते परत मिळालेला रक्कमेचा प्रतीकात्मक चेक देऊन कंपनीला परत ती रक्कम दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार कुणाल सावळे, राजेश भरकडे, प्रवीण सावंत, सोमनाथ बोरकर सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.



