•Mira Road Online Work From Home Fraud काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम महिलेला परत मिळवून देण्यास यश
मिरा रोड :- सायबर भामट्यांकडून सावधान रहा अन्यथा वर्कशॉप होम च्या नावाखाली तुमची ही होऊ शकते फसवणूक! वर्क फ्रॉम च्या नावाखाली एका महिलेचे एक लाख 7 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. youtube ऑनलाइन लाईक स्टास्क, ऑनलाइन हॉटेल मुव्ही रेटिंग यांना लाईक करण्याचे काम देण्यात आले होते. तसेच सायबर भुरट्यांनी त्या महिलेला हे टास्क पूर्ण केल्यास तसेच त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळेल असे अमिष दाखवून महिलेची एक लाख 7 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी) 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनी किवकुमार कनोजिया (30 वर्ष, रा.मिरा रोड) या महिलेने काशिमिरा पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. महिलेने केलेला तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी काशिगाव पोलिसांच्या सायबर विभागाने तपास करत महिलेने केलेल्या व्यवहारा संदर्भात वेगवेगळ्या बँक खात्यावर वळती केल्याचे दिसून आले. पोलीस यांनी त्वरित संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून सदर रक्कम गोठविण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासोबत पत्रव्यवहार करून काशिगांव पोलिसांच्या सायबर विभागाने फसवणुकीतील एक लाख 7 हजार रुपये रोशनी कनोजिया या महिलेच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…