क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Crime News : युट्युब व्हिडिओ लाईक, ऑनलाइन हॉटेल मूव्ही रेटिंग टास्क‌ ,”Work From home”नावाखाली फसवणूक

Mira Road Cyber Crime News : काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश, चार लाख 40 हजार रुपयाची फसवणूक

मिरा रोड :- सायबर भामट्यांकडून सावधान रहा..! Cyber Crime Awareness अन्यथा Work From home च्या नावाखाली तुमची ही होऊ शकते फसवणूक! वर्क फ्रॉम च्या नावाखाली चार लाख लाख 40 हजारांची फसवणूक झाल्याची घटन काशीगाव पोलीस ठाण्यात Kashigaon Police Station दाखल करण्यात आली होती. youtube ऑनलाइन लाईक स्टास्क, ऑनलाइन हॉटेल मुव्ही रेटिंग यांना लाईक करण्याचे काम देण्यात आले होते. तसेच सायबर भुरट्यांनी हे टास्क पूर्ण केल्यास तसेच त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळेल असे अमिष दाखविले होते. काशिगाव पोलीस ठाण्याच्या Kashigaon Police Station हद्दीत राहणाऱ्या बलवंतराय रामजीभाई सुरती यांनी चार लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी) 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Latest Crime news

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलवंत राय सुरती यांनी काशिगांव पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी काशिगाव पोलिसांच्या सायबर विभागाने तपास करत केलेल्या व्यवहारा संदर्भात वेगवेगळ्या बँक खात्यावर वळती केल्याचे दिसून आले. पोलीस यांनी त्वरित संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून सदर रक्कम गोठविण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासोबत पत्रव्यवहार करून काशिगांव पोलिसांच्या सायबर विभागाने फसवणुकीतील चार लाख 40 हजार रुपये बलवंत सुरजी यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे. Mira Road Latest Crime news

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे. Mira Road Latest Crime news

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0