Mira Road Crime News : गावठी हातभट्टीची दारु विक्री करणा-या महिलेला अटक

•30 लिटर गावठी हातभट्टीची दारू, 24 देशी दारू संत्रा,जीएम दारू जप्त महिलेविरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मिरा रोड :- अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मीरा भाईंदर पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी या महिले कडून 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू, 90 ml च्या 24 प्लॅस्टिकच्या देशी दारू, संत्रा जीएम दारूचे अवैध विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी या महिलेला अटक करून तिच्या विरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांचे सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली होती की वर्सोवा गावातील,हिल व्हिव गेस्ट हाऊसच्या पाठीमागील चंदर रामजी जाधव यांच्या रूममध्ये राहणारी निर्मला जाधव ही राहत असलेल्या घराच्या बाजूच्या पाडवीमध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची खात्रीदायक बातमी मिळाली होती.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पक्षाच्या पथकाने दोन पंचांसमक्ष छापा टाकला असता निर्मला अनंत जाधव (35 वय रा.चंदर रामजी जाधव यांची रुम, हिल व्हिव गेस्ट हाऊसच्या पाठीमागे, दुर्गादेवी रोड, वर्सोवा गांव, काशिमिरा) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेच्या ताब्यातून तीन हजार सहाशे रुपये किमतीचा 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू, 840 रुपये किमतीचे 90 मिली 24 प्लास्टिकच्या देशी दारू, संत्रा, जीएम विक्री करत असताना पोलिसांनी छापेमारी केली असता महिलेला 870 रोख रकमेसह ताब्यात घेतले आहे. तसेच, महिलेला दारू पुरवणारा गणेश (रा. ससुनवघर) यालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर महिलेच्या विरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, राजाराम आसावले, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर पोलीस हवालदार सम्राट गावडे यांनी केली आहे.