Mira Road Crime News : घराच्या बाजूलाच सुरू केली गावठी दारुची हातभट्टी, 2 महिलांना अटक

•घराच्या बाजूला पाडवीमध्ये गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी भट्टी सुरू होती. दारुची चोरटी विक्री करीत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मिरा रोड :- मिरारोड शहरातील काशिमिरा परिसरामध्ये असलेल्या डाचकुलपाडा मीरा-भाईंदर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध गावठी हातभट्टी अड्यावर छापे मारुन उध्दवस्त केला आहे.दारुची चोरटी विक्री करीत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
काशिमीरा परिसरातील डाचकुलपाडा येथील महादेव मंदिर जवळील सद्गुरू कृपा वेल्फर सोसायटी येथे दोन महिला घराच्या शेजारी असलेल्या जागेमध्ये पडवीमध्ये गावठी दारू विक्री करत असल्याचे बातमी मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील आणि सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील यांनी कारवाई करत दोन महिलांना ताब्यात घेतले. लक्ष्मी बाळू कुलकर्णी (50 वय रा. महादेव मंदिर जवळ डाचकुलपाडा, मिरा रोड) आणि सुनीता कमलेश विरचंदाली (35 वय रा.महादेव मंदिर जवळ डाचकुलपाडा, मिरा रोड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांचे नावे आहेत. लक्ष्मी हिने घराजवळ असलेल्या पाडवीमध्ये स्वतःच्या आर्थिक फायदा करिता 1410 किंमतीचे 11.75 लिटर गावठी हातभट्टीचे दारू तसेच 1505 किमतीची 10 मिलीच्या 43 प्लास्टिकच्या देशी दारू संत्री जीएम जवळ बाळगून विक्री करत असताना पोलिसांनी 13130 रुपयाच्या रोख रकमेसह ताब्यात घेतले आहे. तसेच सुनीता तिच्या घराजवळ असलेल्या पाडवी मध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 2345 रुपये किमतीच्या 90 मिलीच्या 67 प्लास्टिकच्या देशी दारू संत्र जीएम जवळ बाळगून विक्री करत असताना 1120 रोख रक्कमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे यांनी पंचा समक्ष कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले आहे तसेच पोलिसावलदार केशव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिलांच्या विरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, उमेश पाटील, अनिल पवार, सहाय्यक फौजदार रामचंद्र पाटील,राजाराम आसावले,शिवाजी पाटील, पोलीस हवालदार चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर,अश्विनी भिलारे यांनी केली आहे.