काशीमिरा गुन्हे शाखेचा छापा; मिरा रोड परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांना मोठा धक्का
मिरा रोड | मिरा रोड पूर्व नयानगर परिसरातून होंडा अॅक्टिवा दुचाकी चोरीप्रकरणी तपास करताना गुन्हे शाखा कक्ष १ काशीमिरा यांना मोठे यश मिळाले आहे. शाहाब उर्फ ‘चरबा’ शाहीद शेख (वय 26) या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मुंबई, पालघर, मिरा-भाईंदर परिसरात 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
अशा प्रकारे घडली चोरी
2 जून 2028 रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 10.30 च्या दरम्यान फिर्यादीने आपली होंडा अॅक्टिवा (MH 04 GX 8156) दुचाकी पय्याडे हॉटेलसमोर (नयानगर, मिरारोड पूर्व) पार्क करून कामासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. दुचाकीची किंमत सुमारे तीस हजार असून फिर्यादीच्या संमतीशिवाय ती चोरीस नेण्यात आली होती. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा भादंवि कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून कारवाई; मुंबई, पालघरसह अनेक भागांत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल
पोलिस आयुक्त यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा समांतर तपास काशीमिरा गुन्हे शाखेने सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी आरोपी शाहाब शेख याला शिताफीने अटक केली. ‘चरबा’ या टोपणनावाने ओळखला जाणारा हा आरोपी भायंदर पश्चिम येथील उत्तन भागात वास्तव्यास होता.
शाहाब शेख याच्या विरोधात यापूर्वी दुचाकी चोरी, घरफोडी आणि लुटीचे एकापेक्षा एक गंभीर गुन्हे मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात नोंद आहेत. त्यामुळे या अटकेने चोरीच्या साखळीला मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.आरोपीस पुढील कारवाईसाठी नयानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे,पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे,सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ,पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप,पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत,पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे,सहाय्यक फौजदार अशोक पाटील,अविनाश गर्जे,पुष्पेंद्र थापा,संतोष लांडगे,पोलीस हवालदार मनोज चव्हाण,सचिन हुले,सुधीर खोत,अश्विन पाटील,सन्नी सूर्यवंशी, प्रशांत विसपुते,गौरव बारी,पोलीस शिपाई सौरभ इंगळे, पोलीस शिपाई धिरज मेंगाणे, किरण आसवले,सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…