Mira Road Crime News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात! सायबर चोरट्याचा महिलेला “धोका” तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक
•सायबर विभागाच्या पोलिसांनी दमदार कामगिरी करत फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यात यश
मिरा रोड :- शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर भामट्याने दिले होते. आर्थिक लोभाला बळी पडत मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पंगम या महिलेची तब्बल 41.27 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात सायबर विभागाने गुंतवणुकीतील फसवणुक झालेली रक्कम सायबर पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्यांच्या मूळ खात्यात आणून देण्यास सायबर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 318 सह आयटी ॲक्ट 66(ड) प्रमाणे फसवणूक झाल्याबाबतची तक्रार दाखल झाली होती. तक्रारदार पंगम यांना शेअर ट्रेडिंग करून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी एकूण 41.19 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु आपली फसवणूक झाली हे लक्षात येतात सायबर पोलिसांना त्या संदर्भात तक्रार केली पोलिसांनी तक्रारदार आणि आरोपी यांच्या व्यवहाराचे अवलोकन करून तक्रार यांनी पाठवलेले रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सर्व रक्कम गोठविले आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बँकेची पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर फसवणूक झालेली एकूण रकमेपैकी 30.66 लाख रुपये परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.सायबर पोलीस ठाणे पांचे प्रयत्न सुरु होते. सायबर पोलीस ठाणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांचे उर्वरीत रक्कम तक्रारदार यांचे बैंक खात्यात जमा करण्यात आली आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.प.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार कुणाल सावळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.