Mira Road Crime News : गांजा पुरविणाऱ्या टोळीचा मोरक्या पोलिसांच्या तावडीत सापडला… तीन वर्षापासून पोलीसांना देत होता गुंगारा..
Mira Road Crime Branch Arrested Ganja Suppliers : मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून एका सराईत गांजा तस्करी आणि विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले अटक, तीन वर्षापासून होता फरार..
मिरा रोड :- 14 जुलै 2021 रोजी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस (Mira Road Police) आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ (Drug ) विरोधी पथकाला अवैधरित्या गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तिन्ही आरोपींना एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. यामध्ये विनयकुमार ब्राह्मणदेव पाठक, प्रतीक कानुबाई पटेल, राजू पुन्नास्वामी देवर या तीन आरोपींना पोलिसांनी 15 जुलै 2021 रोजी अंमली पदार्थ विक्रीसाठी आल्यावर मिरा रोड पोलिसांनी (Mira Road Police )अटक केली होती. पोलिसांनी या आरोपींकडून 1 लाख 44 हजार 338 रुपयांचे गांजा पोलिसांनी जप्त केला होता. परंतु यांचा मुख्य सूत्रधार आणि गांजा पुरवणाऱ्या मुख्य आरोपी तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु तीन वर्षानंतर पोलिसांनी गांजा पुरवणाऱ्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. गेले तीन वर्ष कृष्णा नायडू, आणि त्याच्या साथीदार राजू नायडू आणि श्याम हे ड्रग्ज पेडलर पोलिसांपासून पळ घेत होते. Mira Road Crime News
पोलिसांचा यशस्वी सापळा
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील मुख्य आणि फरारी आरोपी यांना अटक करण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या होत्या. या सूचनेच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी पोलीस पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे,पोलीस हवालदार मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, संग्रामसिंग गायकवाड यांनी अंमली पदार्थाचे विक्री करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या आरोपीला मुस्क्या आवळण्यास सांगितले होते. पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कृष्णा नायडू पेणकरपाडा रोड दहिसर चेक नाका या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी सापळा रचून कृष्णा राजू नायडू (39 वर्ष) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला मिरा रोड पोलीस ठाण्यात हजर केले असून पोलिसांकडून आरोपीची चौकशी केली जात आहे. Mira Road Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) (अतिरिक्त कार्यभार), भास्कर पुकळे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, संग्राम गायकवाड, हनुमंत सुर्यवंशी, पोलीस अंमलदार अंगद मुळे व सचिन चौधरी यांनी केली आहे. Mira Road Crime News