क्राईम न्यूज

Mira Road Crime News : ‘कासीम खान’चा गोव्यात पर्दाफाश; अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई

Mira Road Police Arrested Drug Smuggler : NDPS प्रकरणात सराईत आरोपी जेरबंद,गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणावरून गोव्यातून अटक

मिरा रोड | अंमली पदार्थांच्या साखळीचा प्रमुख पुरवठादार ठरलेला अरबाज ऊर्फ कासीम निसार खान यास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने गोवा राज्यातून अटक करून महाराष्ट्रात आणले. 116.7 ग्रॅम मॅफेड्रॉनसह अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून माहिती मिळाल्यानंतर कासीम खानचा तपास सुरु होता. तो गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता आणि गोव्यात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. Mira Road Latest Crime News

रॅकेटचा ‘डॉन’ गोव्यातून गजाआड
दिनांक 17 मे 2025 रोजी, मिरारोड येथील दोन आरोपींकडून 23 लाखांहून अधिक किमतीचा मॅफेड्रॉन जप्त करण्यात आला होता. त्यानंतर काशीगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की, सदर मादक पदार्थ कासीम खान यानेच पुरवले होते. पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने आणि तांत्रिक विश्लेषणातून गोवा येथील ठिकाण ओळखून 21 जुलै रोजी नॉर्थ गोवा येथून त्याला 1.30 वाजता अटक केली.

कासीम खान याच्याविरोधात मिरारोड पोलीस ठाणे आणि काशीमिरा पोलीस ठाणे येथे देखील एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी पोलिसांच्या रडारवर असून अंमली पदार्थांच्या व्यवसायात त्याचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक अचिराज कुराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पुष्पराज सुर्वे आणि त्यांच्या पथकाने ही योजना यशस्वीरीत्या राबवली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

38 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago