Mira Road Crime News : मिरारोडमध्ये रामदेवपार्क भागात मिराक्की थाई स्पा पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून तीन तरुणी ताब्यात

•स्पा मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने उघडकीस आणला.
मिरा रोड :- रामदेवपार्क भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले, तसेच मसाज पार्लरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदेवपार्क,मिरारोड पूर्व भागात ‘मिराक्की थाई स्पा, येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली.याप्रकरणी मसाज पार्लरचा चालक आणि मॅनेजर या दोघांविरुद्ध मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला.त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसाज पार्लरचा चालक तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले. तसेच या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलींची आणि दोन तरुणींची सुटका केल्याचे सांगितले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, राजाराम आसावले, शिवाजी पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर,तृषा कटकथोंड पोलीस हवालदार सम्राट गावडे यांनी केली आहे.