Mira Road Crime News : आक्षेपार्ह मेसेज पोस्ट करणारा तोतया पत्रकारास अटक
Mira Road Crime News Person Get Arrested For Creating Violence In Two Religion : दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी पत्रकारांचे व्हाटसअपग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज पोस्ट करणारा तोतया पत्रकारास अटक “
मिरा रोड :- 14 एप्रिल रोजी”महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ” Maharashtra News Network या पत्रकारांचे व्हाटसअप या प्रसारमाध्यमांवर 4 पत्रकारांचे फोटो लावुन त्याखाली धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारित केल्याचे सबंधित पत्रकारांचे निदर्शनास आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरुन नयानगर पोलीस ठाणे भादंविस कलम 419,476,500,501,506 प्रमाणे गुन्हा दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी दाखल आहे. Mira Road Crime News
नजिकच्या काळात नयानगर परिसरात उदभवलेल्या जातीय तेढच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन तातडीने गुन्हयाचा तपास करुन “महाराष्ट्र न्यूज नेटवर्क” या व्हाटसअपग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज पोस्ट केलेला आरोपीस निष्पन्न करुन त्यास 15 एप्रिल 2024 रोजी अटक करण्यात आली. अधिक तपास करण्यात येत आहे. Mira Road Crime News
पोलीसाकडून नागरीकांना आवाहन
नागरीकांना याव्दारे अशा प्रकारचे धार्मिक/जातीय तेढ निर्माण करणारे तसेच सामाजिक असंतोष निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश कोणत्याही सोशल मिडीयावर पोस्ट न करणेबाबत तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणेबाबत तसेच अशा प्रकारच्या घटना निदर्शनास येताच त्याबाबत तात्काळ पोलीस विभागाला माहीती देवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Mira Road Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग, विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नयानगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग भाट, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जगताप, पोलीस हवालदार विजय गुरव सर्व नेमणुक नयानगर पोलीस ठाणे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.