Mira Road Credit Card Online Scam News सायबर पोलीस ठाणेस यश ; Credit Card द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम 1 लाख 87 हजार 206 रुपये परत.
मीरा रोड : क्रेडिट कार्ड कस्टमर केअरचा विभागातून बोलत असल्याचे सांगून दोन लाखाचे आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली असता पोलिसांच्या सायबर विभागाने त्वरित कारवाई करत खंडित झालेले पैसे तक्रारदाराच्या खात्यावर परत करण्यास पोलिसांना यश आले. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील नवघर पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार वृषाली यांना क्रेडिट कार्ड विभागातुन बोलत असल्याचे सांगून अनोळखी मोबाईलवर फोन केला. क्रेडिट कार्डाचे व्यवहार सुरळित चालु ठेवण्याकरीता तक्रारदार यांना कार्डाची माहिती देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी कार्डची माहिती दिली असता त्यांचे क्रेडिट कार्डाचे खात्यातुन 2 लाख 06 हजार 153 रु कट झाल्याचा मॅसेज आल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झालेबाबत सायबर पोलीस ठाणे अर्ज दिनांक 13 मार्च 2024 अन्वये प्राप्त करण्यात आला आहे. Mira Road Crime News
नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. सदरची फसवणूक रक्कम Reliance Retail/PAY TM या मचैड च्या अकाऊंटवर गेल्याचे दिसून आले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून फसवणूक रक्कम थांबविण्यात आली. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळे सदरची फसवणूक रक्कमेपैकी 1 लाख 87 हजार 206 रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली. Mira Road Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबूरे Avinash Ambure , पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, पोलीस अंमलदार ओकांर डोंगरे, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार कुणाल सावळे बोरसे यांनी पार पाडली आहे. Mira Road Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…