Mira Road Crime News : चुकून तुमच्या खात्यावर पैसे पाठवले, असे सांगून ऑनलाइन फसवणूक, 22 हजार 493 रुपयाची फसवणूक
•Mira Road Crime News सायबर पोलिसांची कामगिरी ; ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास यश
मिरा रोड :- हॅलो.. मी चुकून तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले आहे, असा कॉल त्रिवेदी यांना आला होता. त्रिवेदी हे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणारे आहे. तो कॉल खोटा आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपली आर्थिक फसवणूक केली आहे हे लक्षात येताच त्यांनी त्या संदर्भात मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाला तक्रार केली असता त्यांनी त्वरित ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम त्रिवेदी यांच्या मूळ खात्यावर पैसे परत मिळून देण्यास सायबर पोलिसांना मोठी कामगिरी केली आहे.
ऑनलाइन फसवणुकीची रक्कम Flipkart मर्चंट च्या खात्यावर
त्रिवेदी यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाला दिलेल्या तक्रारीवरून सायबर विभागाने त्वरित तक्रारी संदर्भात तांत्रिक तपासणी केली असता, सदर फसवणुकेतील रक्कम ही Flipkart या ऑनलाईन मर्चंट खात्याद्वारे पुढे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सायबर विभागाने तात्काळ पत्रव्यवहार करून ती रक्कम गोठवून त्याच्या मूळ खात्यात परत पाठवलेला पोलिसांना यश आले आहे. सायबर पोलिसांनी 22 हजार 493 रुपये मूळ खाते धारक असलेले त्रिवेदी यांच्या खात्यावर परत मिळून दिले. सायबर पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे त्रिवेदी यांची कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान झाले नाही.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त (परी 01), मदन बल्लाळ, सहाय्यर पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, पोलीस अंमलदार शुभम कांबळे महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, प्रविण सावंत यांनी पार पाडली आहे.