•मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाची कामगिरी ; फसवणुकीतील 1.25 लाख रुपये परत मिळून देण्यात पोलिसांना यश
मिरा रोड :- 23 मे 2024 रोजी वाणी यांना मोबाईलवर गॅस बिल भरण्याबाबत आणि अपडेट करण्यासाठी एक लिंक प्राप्त झाली. वाणी यांनी त्या लिंक मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून त्या माहितीच्या आधारे ऑनलाइन भामट्यांनी वाणी यांच्या खात्यातून एक लाख 25 हजार रुपये काढल्याचे मेसेज वाणी यांना प्राप्त झाला होता. सदर लिंक बनवत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत तात्काळ सायबर पोलिसांना तक्रार दिली. या घडामोडीच्या दरम्यान वाणी हे कामानिमित्त पुण्याला गेले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
PayU यांच्याशी पत्रव्यवहार करून आर्थिक फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश
वाणी यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. सायबर पोलिसांनी तक्रारदारांचे व्यवहाराचे अवलोकन करून फसवणूक झालेली रक्कम ऑनलाईन मर्चंड PayU च्या माध्यमातून पुढे वळती केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलीसांनी तात्काळ PayU यांच्यासोबत पत्र व्यवहार करून तक्रारदाराची रक्कम गोठून मूळ खात्यात परत आणण्याबाबत पत्रव्यवहार केले होते. पोलिसांनी सतत पाठपुरावा करून तक्रारदार यांच्या फसवणुकीचे पूर्ण रक्कम एक लाख 25 हजार त्यांच्या खात्यावर परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक सहा पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार कुणाल साबळे,शुभम कांबळे, राजेश भरकडे यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…