Mira Road Crime News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; क्रेडिट कार्ड रिडीम पॉईंटची बनावट लिंक, क्षणार्धात खात्यातून 89 हजार गायब
•Mira Road Online Credit Card Scam सायबर शाखेने फसवणुकीची 89,998 हजारांची रक्कम परत मिळवून देण्यात यश
मिरा रोड :– मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने काशिगांव परिसरात राहणाऱ्या दुबे यांची क्रेडिट कार्ड रिडीम पॉईंटच्या माध्यमातून बनावट लिंक द्वारे फसवणूक झाल्याची घटना सायबर विभागात दाखल करण्यात आली होती. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीमध्ये दुबे यांचे 89 हजार 998 एवढी रक्कम मोबाईल वरील लिंक ओपन केल्यानंतर क्षणार्धात गायब झाली होती.
दुबे यांनी सायबर विभागाला आर्थिक फसवणूक झाल्याबाबतची तक्रार दाखल केली. दुबे यांनी पोलिसांना सांगितले की,क्रेडिट कार्ड रिडीम पॉईंट खात्यात जमा करण्याकरिता मेसेज द्वारे एक लिंक प्राप्त झाली. ती लिंक ओपन केल्यानंतर ॲप डाऊनलोड झाला आणि त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डच्या खात्यातून 89,998 रुपये गायब झाल्याचा मेसेज आला. सायबर विभागाने त्वरित कारवाई करत तक्रारदार यांच्या व्यवहाराबाबतचे तपासणी केली. तसेच ऑनलाईन फसवणुकीची रक्कम ही ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पुढे वळती झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ पत्र व्यवहार करून ती रक्कम गोठवुन न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली दुबे यांच्या खात्यात परत मिळून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, विलास खाटीक, शुभम कांबळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे , यांनी पार पाडली आहे.