Mira Road Crime News: राष्ट्रीय स्तरावर चोरीचे वेगवेगळयां कंपनीचे ट्रक, आयशर टेम्पो व इतर वाहने चोरी करुन, बनावट कागदपत्रे तयार करुन त्याची विक्री करणारी टोळी गजाआड

04 आरोपी जेरबंद विविध राज्यातुन चोरी केलेली रुपये 7 सात कोटी 32 लाख 41 हजार किंमतीची तब्बल 47 वाहने जप्त,गुन्हे शाखा कक्ष 01 ची कामगीरी




मिरा रोड :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गेल्या काही दिवसांपासून ट्रक चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. Mira Road Crime News
15 फेब्रुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अमर पैलेस ब्रिज जयल रोडचे बाजुस फिर्यादी रमेश जसवंतलाल चौधरी वय (43 वर्ष) यांचा हायवा टिपर/ट्रक पार्क केला असताना कोणीतरी तो चोरुन नेला अशी तक्रार दिल्याने काशिमिरा पोलीस ठाणे येथे भादवि कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Mira Road Crime News
30 जुन 2023 दरम्यान नागाई देवी मंदीराच्या बाजुला, वालीच, वसई पूर्व, ता. वसई, जिल्हा पालघर येथे फिर्यादी रामप्रकाश हरिराम यादव (40 वर्ष) रा. नालासोपारा पूर्व, यांचा आयशर टेम्पो पार्क केला असताना कोणीतरी तो चोरुन नेला अशी तक्रार दिल्याने वालीव पोलीस ठाणे येथे भादवि कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस आयुक्त ,अपर पोलीस आयुक्त , पोलीस उप आयुक्त (गुन्हे) साो यांनी मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात मागील 3-4 वर्षात वाहन चोरी संदर्भातील उघडकीस न आलेल्या गुन्हयांचा तपास करुन सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष 01, काशिमिरा मार्फत तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहीतीप्रमाणे तपास करण्यात आला. त्याप्रमाणे आरोपी नावे 1) अजहर अकबर शेख (35 वर्षे) धारखेड परिसर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर, 2) समीर नसीर खान (41 वर्षे), रा. खंडाळा, ता.वैजापुर, जि. छत्रपती संभाजी नगर, 3) मोहम्मद शकील मोहम्मद शौकत शाह (48 वर्षे) व्यवसाय-गाडी खरेदी विक्री अमरावती व 4) शेख नशीर शहजादमियों (43 वर्षे) व्यवसाय-ड्रायव्हर/गाडी खरेदी विक्री, रा. नांदेड यांना ताब्यात घेउन अटक करण्यात आली व न्यायालया समक्ष हजर करुन पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करुन योग्य तो तपास करण्यात आला,तपासा दरम्यान आरोपीनी प्रथमतः खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्या अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश, नागलैंड इ. राज्यांतील विविध आर.टी.ओ. कार्यालयामध्ये गाड्यांचे रजिस्ट्रेशन करुन रजिस्ट्रेशन नंबर व इतर कागदपत्रे प्राप्त केली, त्या कागदपत्रांच्या आधारे सदरची वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करावयाची आहेत असे सांगून संबंधीत आर.टी.ओ. कार्यालयाची ऑनलाईन एन.ओ.सी. प्राप्त केली. तदनंतर कागदपत्रांवर नमुद असलेल्या मेक आणि मॉडेलप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांतुन गाड्या चोरी केल्या. चोरलेल्या गाड्यांचे मुळ इंजिन नंबर, चेसिस नंचर व इतर ओळख पटविण्यासाठी लागणारे नंबर खोडुन त्यावर बनावट कागदपत्रांवरील इंजिन, चेसिस नंबर प्रिंट करुन महाराष्ट्रातील आर.टी.ओ. मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन केले व त्या गाड्या इतर लोकांना विक्री केल्या.Mira Road Crime News






तपासामध्ये आरोपीतांकडुन एकुण 7 कोटी 32 लाख 41 हजार किंमतीचे चोरीची 47 चाहने (त्यामध्ये टाटा ट्रक – 14, हायवा टिपर 10, आयशर टेम्पो 8, अशोक लेलैंड ट्रक/टेम्पो 1, मारुती सुझुकी अटींगा 1, मारुती सुझुकी वॅगनार 1, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर 1, टोयोटा इनोव्हा 1, फोर्स क्रुझर – 1 च महीन्द्रा जितो – 1) जप्त करण्यात आली असुन त्यापैकी 16 चाहने चोरी झालेबाबत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. Mira Road Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त ,श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास टोकले, प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे, सहाय्यक फौजदार राजु तांबे, सहाय्यक पोलीस फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुजेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, विकास राजपुत, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, किरण आसकले, सहाय्यक पोलीस फौजदार सतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हयांचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिप शिंदे व पोलीस हवालदार संतोष लांडगे करीत आहेत.