Mira Road Crime News : काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-01 मोठी कामगिरी ; तीनशे कोटीहून अधिक किंमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा लावला छडा, अंमली पदार्थ पेडलर,अंडरवर्ल्ड संबंध असलेल्या 15 आरोपींना पोलिसांनी केले अटक
•अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या 15 आरोपींना पोलिसांनी अटक करून, त्यांच्या अंमली पदार्थ विक्रीची साखळी पोलिसांनी केली उध्वस्त, कोट्यावधीचा अंमली पदार्थाचा पोलिसांनी घेतला शोध…
मिरा रोड :- काशीमीरामध्ये एका घटनेनंतर पोलिसांच्या तपासातून कोट्यावधीचा ड्रग्ज रॅकेट पर्दाफाश करण्यात आला आहे. तसेच, 15 ड्रग्ज पेडलर पोलिसांकडून अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या आरोपींकडून एम.डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ ज्याची अंदाजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 327 कोटी 69 लाख 43 हजार 60 रुपये असे आहे पोलिसांनी जप्त करून अर्थात उध्वस्त केला आहे. 15 ही आरोपी अंडरवर्ल्डशी कनेक्शन असून त्यांच्याकडून केमिकल्स बनवणाऱ्या विविध राज्यातील कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून हे संपूर्ण रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे.
15 आरोपींचे ड्रग्ज रॅकेट उघडकीस..
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर वाहतुकीवर पोलिसांकडून निर्बंध घातले होते, काशिमिरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक राखाडी रंगाच्या गाडीतून ठाणे घोडबंदर मार्ग मीरा-भाईंदर परिसरात एम.डी हा अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याचे खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी द्वारका हॉटेल चेनगाव येथे मे महिन्यात सापळा रचून दोन आरोपींना अटक केली त्या आरोपींकडे दोन कोटी रुपयांचे एमडी हा अमली पदार्थ मिळाला होता. त्या आरोपींचे नाव शोहेब हनीफ मेमन आणि निकोलस लिओफ्रेड टायटस या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती त्यांच्याविरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात एनडी पीसीएस कायद्यांतर्गत 1985 कलम 8 (सी), 22 (सी),29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबादच्या तेलंगणा राज्यातील आरोपींच्या कनेक्शन ठाण्याच्या पडघ्यापर्यंत
गुन्ह्यातील आरोपींची चौकशी करताना आरोपी सोयब्याने दिलेल्या माहितीवरून त्यांनी हे सर्व अमली पदार्थ हैदराबाद येथे राहणाऱ्या दयानंद उर्फ दया माणिक मुद्दनार आणि नासिर उर्फ बाबा जानेमियों शेख हैदराबाद राज्य तेलंगणा यांच्याकडून घेतले असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी एक पथक हैदराबाद येथे रवाना करून 17 मे 2024 रोजी त्यांना तेलंगणाच्या सायबराचाद येथून त्यांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणा येथे दयानंद उर्फ दया यांची असलेले फॅक्टरी येथे छापा टाकला असता त्या फॅक्टरी मधून वीस लाख साठ हजार किमतीचे 130 ग्रॅम एमडी पावडर 25 करोड किमतीची कच्चामाल एमडी केमिकल आणि एमडी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले तसेच आरोपी दयानंद उर्फ दय्याने दिलेला माहितीवरून आरोपी घनश्याम रामराज सरोज, याला उत्तर प्रदेश वाराणसी येथून ताब्यात घेतले तर मोहम्मद शकील मोहम्मद मोईन मुंबईच्या गोरेगाव येथून अटक केली त्याच्या स्विफ्ट कार मध्ये एकूण 14 लाख 38 हजार किमतीचे 71. 90 हा अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची कार ही जप्त केली. तसेच आरोपी दयानंद उर्फदय आईने दिलेल्या माहितीवरून भरत उर्फ बाबू सिद्धेश्वर जाधव हा ठाण्याच्या शहापूर येथील गणेशपुरी येथून त्याला 27 मे रोजी ताब्यात घेतले त्याच्या घरातून 53 हजार 710 रुपये किमतीचा एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि केमिकल्स पोलिसांनी जप्त केले होते आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती.
हवाला मार्गाने पैशाचे देवाण-घेवाण करणारे आरोपींना अटक
पोलिसांच्या तपासामध्ये एमडी बनवण्यासाठी लागणारे पैसे व एमडी विकून मिळणारे पैसे यांची देवाण-घेवाण करणारे आरोपीला सुरत येथून अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीचे नाव झुल्फिकार उर्फ मूर्तझा मोहसीन कोठारी याला अटक केली आहे. या आरोपीकडून 10 लाख 84 हजार रोक रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी अंगडिया (हवाला) याच्यामार्फत व्यवहार करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले तसेच हवाला करणारा मुस्तफा येसूबाई फर्निचर वाला व हुसैन मुस्तफा फर्निचर वाला यांना मुंबईच्या भेंडी बाजारात परिसरातून सलीम डोळा येणे पाठवलेले सहा लाख 80 हजार रुपयासह अटक केली आहे. त्याच्या सर्व पैसे पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांच्या या तपासानंतर जोनपुर येथे सलीम डोळा याला अटक के आरोपी दयानंद मुददनार त्याचा साथीदार अमीर तौफिक खान अझमगडच्या उत्तर प्रदेश आणि त्याचा चाचू तौफिक खान त्यांच्या साथीदार इतर लोकांप्रमाणे मार्फत एमडी बनवण्याचे युनिट चालवत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपी बाबू तौफिक खान,मोहम्मद नदीम मोहम्मद शफीक खान, एहमद शहा फैसल शफीक आज यांना उत्तर प्रदेश मधून अटक करून त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य जे एकूण 300 कोटी किमतीचे 300 किलो वजनाचे 12 कच्चे एमडी इम जप्त केले आहे. यामधील आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून अटक केली आहे. तसेच पोलिसांनी 15 व आरोपी अभिषेक उर्फ शुभम नरेंद्र प्रताप सिंग याला 01 जुलै रोजी नालासोपाऱ्यातून अटक करून त्याच्याकडून तीन पिस्टल एक रिवाल्वर आणि 33 जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहे.
पोलिसांकडून तीनशे कोटीहून अधिक मुदमुद्देमाल जप्त
गुन्ह्यातील सहभागी आरोपींना पोलिसांनी महाराष्ट्र राज्यातून तीन तेलंगणातून तीन उत्तर प्रदेश मधून आठ गुजरात मधून एक असे एकूण 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 327 कोटी 69 लाख 43 हजार 60 रुपये किमतीचा एम.डी हा अंमली पदार्थ कच्चे एम.डी बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स साहित्य,03 पिस्टल, 01 रिवाल्वर, 33 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलीस पथक
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 01 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक राजु तांबे, सहाय्यक पोलीस उपनिरी संदीप शिंदे, पोलीस हवालदार संजय शिंदे, संतोष लांडगे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, सचिन हुले, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपुत, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, सौरभ इंगळे, गौरव बारी, धिरज मेंगाणे, मसुब किरण असवले व सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण (सायबर गुन्हे) यांनी केली असून सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.